हडपसर मध्ये भाजप मनसेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
पुणे-
हडपसरमधीलं भाजप व मनसे चे योगेश ससाणे व सविता मोरे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये जाहीर प्रवेश केला.
निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, महापौर प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले नगरसेवक चेतन तुपे, प्रवीण तुपे, निलेश मगर, योगेश जगताप आदी उपस्थित होते.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक दत्तात्रय ससाणे, हडपसर विभाग कोषाध्यक्ष योगेश ससाणे, मनसे हडपसर उपाध्यक्ष सविता मोरे, उपाध्यक्ष अमोल मारणे, सचिन मोरे, राजेंद्र पवार, उबेद खान, इम्रान खान, वसंतराव फाऊंडेशन चे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्यासह काँग्रेस चे किरण होले, राजू हिंगणे व असंख्य कार्यकर्त्यांनी नगरसेवक चेतन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.
यावेळी अजित पवार यांनी सत्कार करून व उपरने घालून विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश केला.