पुणे-राष्ट्रवादीने 2012 मध्ये दिलेली 85 टक्के आश्वसने पूर्ण केली आहे. आता 2020 पर्यंत पुणे शहर देशातील पहिले डिजिटल साक्षर शहर करणार, नागरिकांच्या सहकार्याने पुणे शहर डेंग्यू चिकनगुनियामुक्त करणार, 24 तास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अत्याधुनिक स्काडा ही नियोजन प्रणाली अवलंबणार, अशी अनेक आश्वासने असलेल्या 2017 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे अजित पवार यांच्या हस्ते आज हॉटेल तरवडे क्लर्कइन मध्ये प्रकाशन करण्यात आले.
५ वर्षात ८५ टक्के आश्वासने आम्ही पूर्ण केली .. राष्ट्रवादीचा नवा जाहीरनामा प्रकाशित, १० लाख नौकऱ्याचे आश्वासन
यावेळी महापौर प्रशांत जगताप,खासदार वंदना चव्हाण,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके,सभागृह नेते शंकर केमसे,आमदार जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते.
एक दशक प्रगतीचे, पुढील वर्ष समृद्धीचे, असे घोषवाक्य असलेला हा जाहीरनामा आहे. यामध्ये येत्या 5 वर्षात सार्वजनिक वाहतुकीचा वापर 25 टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्नशील बीआरटीएसचे प्रस्तावित मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू करू, 2021-22 पर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील एकूण 31 किमी दोन्ही मार्ग कार्यान्वित करणार, येत्या 10 वर्षात दहा लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याच्या दृष्टीने धोरण राबविणार, प्रभागातील कचरा प्रभागातच जिरविण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करणार शहरातील अमेनिटीज स्पेससाठी मास्टर प्लॅन तयार करणार, पुनवाडी ते ग्लोबल पुणे हा इतिहास उलगडणारे थीम पार्क शहरात उभारणार असून देशातील पहिली डिजिटल महानगरपालिका होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणार अशी जाहीरनाम्यातील महत्वाची आश्वासने आहेत.
यावेळी अजित पवार यांनी, सरकारमधील बाबू लोक पुणेकर आधिक पाणी वापरतात, असे दाखवितात. प्रत्यक्षात किती लोकसंख्येला पाणी देत आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रोच्या 256 त्रुटीची यादी मुख्यमंत्र्यानी जाहीर करावी आघाडी सरकारच्या काळात आम्ही मेट्रो बाबत नेहमी सकारत्मक होतो आणि आज ही आहे. हे सरकार आगामी निवडणूक डोळयासमोर ठेवून निर्णय घेत आहे. डीपी विषयी अद्यापपर्यंत निर्णय घेतला जात नाही. यामुळे शहराचा विकास रखडला आहे, असा आरोपही भाजप सरकारवर केला.
पुणे महापालिकेवर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही हे पुणेकरांनी लक्षात ठेवावे. आमच्या पक्षातील नेत्यांवर जनतेचा विश्वास आहे ते जाणार नाही, असा विश्वास व्यक्त करत पुणेकरांनी राष्ट्रवादीला बहुमत द्यावे, असे आवाहनही अजित पवार यांनी केले.