पुणे- महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या मुख्यालय परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर प्रशांत जगताप ,आमदार अनिल भोसले, उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, स्थायी समितीचे चे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, पी.ए. इमानदार, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा वासंती काकडे यांच्यासह नगरसेवक आणि मंडळाचे पदाधिकारी-अधिकारी उपस्थित होते.
समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची ज्ञानज्योत पोहचवण्याचं काम ज्या सावित्रीबाई फुले यांनी केलं, त्यांच्या पुतळ्यामुळे या परिसरात येणाऱ्या प्रत्येक घटकाला यापासून निश्चितच प्रेरणा मिळेल. असे यावेळी अजितदादा पवार यांनी सांगितले .

