पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस’च्या हिराबाग चौक, टिळक रोड येथील पक्ष कार्यालयामध्ये महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते केक कापण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस’ पुणे शहर आणि झेड.टी.सी.सी., पुणे (झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन सेंटर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अवयव दान अभियाना’ अंतर्गत अवयव दानाचा संकल्प केलेल्या 50 कार्यकर्त्यांना महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शिल्पा भोसले, किरण कद्रे, राहुल तांबे यांनी केले.
या उपक्रमाचे निरीक्षक म्हणून राजलक्ष्मी भोसले, प्रकाशआप्पा म्हस्के, अॅड. भगवानराव साळुंखे यांनी काम पाहिले. यावेळी माजी महापौर मोहनसिंग राजपाल, वासंती काकडे, अशोक राठी, शंकर शिंदे, अॅड. औदुंबर खुने-पाटील, शशिकला कुंभार, शशिकांत तापकीर, पंडीत कांबळे, शिल्पा भोसले, सुनील खाटपे, सुरेश बांदल, रुपाली चाकणकर, राकेश कामठे उपस्थित होते.
कर्वेनगरमधील मातोश्री वृद्धाश्रमातील 200 ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप
कर्वेनगरमधील मातोश्री वृध्दाश्रम’ येथे ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रविंद्रआण्णा माळवदकर यांच्या हस्ते वृद्धाश्रमातील 200 ज्येष्ठ नागरिकांना झोपण्यासाठी इलेक्ट्रीक एयर बेड, टॉयलेट चेअर, कानटोपी, स्कार्फ, राजगिरा लाडू आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व्हीजेएनटी सेलचे विष्णू सरगर केले होते.
यावेळी भटक्या विमुक्त जातीच्या विभाग सेल अध्यक्ष रजनीताई पांचगे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, स्वप्नील दुधाणे, दिंगबर पोकळे, संतोष बराटे, अनिल गायकवाड, किशोर कांबळे, प्रमोद शिंदे, गजानन कड, संजय कोळेकर, राजश्री जाधव, साईराम खेडेकर, दिलीप गवते, तानाजी शिंदे, बंडू तांबे, केदार मारणे, गिरीश भागवत उपस्थित होेते.
हा कार्यक्रम रविवारी मातोश्री वृध्दाश्रम’ राजाराम पुलाजवळ कर्वेनगर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ वाले यांनी केले. अनिल गायकवाड यांनी आभार मानले.
ससून रुग्णालयात फळ वाटप
पुणे स्टेशन येथील ससून रुग्णालयातील रुग्णांना वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार कमलताई ढोले-पाटील यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुरेश भालेराव मित्रमंडळ यांनी केले होते. रजनीताई पांचगे (अध्यक्ष, भटक्या विमुक्त जातीच्या विभाग सेल ), बाळासाहेब दामोदर शिंदे (सल्लागार पुणे शहर) यावेळी उपस्थित होते.