पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या वतीने इंदिरा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आज सकाळी हिराबाग चौक येथील पक्ष कार्यालयात माजी नगरसेवक शिवाजी क्षीरसागर यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष, खासदार अॅड.वंदना चव्हाण उपस्थित होत्या.
यावेळी राजूशेठ गिरे, विनायक चाचर, शंकर शिंदे, आनंद रिठे, नितीन (बबलू) जाधव, शिल्पा भोसले, सुरेश पवार, किशोर मोरे, समीर शेख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.