राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने केंद्र सरकारच्या जुन्या नोटा बदलाच्या नियोजन व्यवस्थेविरोधात आंदोलन
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहरच्या वतीने केंद्र सरकारच्या जुन्या नोटा बदलाच्या नियोजनशून्य व्यवस्थेविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार, अॅड.वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी बालगंधर्व रंगमंदीर चौक येथे सकाळी करण्यात आले. या आंदोलनामध्ये महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर दीपक मानकर, अंकुश काकडे, रूपाली चाकणकर, राकेश कामठे, ऋषी परदेशी, अशोक राठी, अॅड.म.वि.अकोलकर, मोहनसिंग राजपाल, शैलेश बडदे, पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या नोटा बंद निर्णयाचे स्वागत केले गेले. परंतु हे आंदोलन प्रामुख्याने केंद्र सरकारच्या नोटा बदल निर्णयामुळे सामान्य नागरिक, महिला, छोटा व्यावसायिक, शेतकरी यांच्या होत असलेल्या गैरसोयी विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.