महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दीपाली धुमाळ यांची निवड; सामान्य नगरसेविकेच्या निवडीने आश्चर्य

Date:

पुणे- महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी च्या ज्येष्ठ नगरसेविका दीपाली बाबा धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेविका नंदा लोणकर, अश्विनी कदम, नगरसेवक योगेश ससाणे,  सचिन दोडके इच्छुक होते. अशा अनेक नामांकित आणि सभागृहात वादळी भाषणे करीत आपली भूमिका मांडणाऱ्या अनेक मान्यवरांच्या स्पर्धेतून सामन्य नगरसेविका म्हणून ओळख असलेल्या  दीपाली धुमाळ यांची निवड करण्यात आली आहे.यामुळे सर्वांनांच आश्चर्याचा धक्का बसला .आगामी काळात 1 – 1 वर्षे हे पद असणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दिलीप बराटे यांना वर्षभरासाठी हे पद देण्यात आले होते.

तर, पक्षाने माझी निवड केल्याने आभारी असून, आगामी काळात शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले. यावेळी पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, नगरसेवक सचिन दोडके, अरुण पाटील उपस्थित होते. धुमाळ यांचे मुळगाव रायगड तालुक्यातील पाली-सुधागड हे असून त्यांचे शिक्षण बीएससीच्या द्वितीय वर्षापर्यंत झाले आहे. त्यांच्या नियुक्तीमागे ‘रायगड’ कनेक्शन असल्याचे बोलले जात असून राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांच्याशी असलेली बाबा धुमाळ यांची जवळीक उपयोगी ठरल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक बोलत आहेत. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...