पुणे-. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरु करण्यात आलेल्या मतदार नावनोंदणी अभियानाला पर्वती विधानसभा मतदारसंघात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्वतः नव्या मतदारांची नोंदणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पर्वती विधानसभा मतदार संघातर्फे अध्यक्ष नितीन कदम यांनी मतदार नावनोंदणी अभियानाचे आयोजन केले होते. त्यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्वतः नव मतदारांची नोंदणी केली. या अभियानाला सोसायटी आणि मिश्र वस्तीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळीकार्याध्यक्ष दिलीप कांबळे, श्वेताताई होनराव,श्रीमती,मा.फहीम शेख, रझियाआपा काझी,लक्ष्मीताई होनराव, दिनेश खराडे ,मोहसीन काझी ,बाबा महेदवी ,अन्वर शेख,महेबुब मणियार,इरफान बांगी,शाफिक सय्यद,दादालाल हन्नूर,मकबूल भोले, मुबारक हन्नुरे,उमेश डोलारे,लखन वाघमारे,योगेश रणदिवे, संतोष अडागळे,सलीम सय्यद, सोहेल शेख,जावेद हन्नुरे तसेच पर्वती मतदार संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी मोहसीन काझी,बाबा महेदवी,संग्राम होनराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

