पुणे : खासदार वंदना चव्हाण यांचे शपथ विधी नंतर पहील्यादा पुणे शहरामध्ये दि.६/४/२०१८ सायंकाळी पावणे सात वाजता लोहगाव विमान तळ येथे आगमन झाले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंदना चव्हाण यांचे दमदार स्वागत केले.
पक्षाच्या वतीने सलग दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन पर भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन केले होते.
ही मिरवणूक लोहगाव विमानतळापासुन सुरुवात, मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यान, वाडिया कॉलेज, दादासाहेब गायकवाड पुतळा, महात्मा गांधी पुतळा, रेल्वे स्टेशन दर्गा, डाॅ .बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कलेक्टर आॅफीस, सारसबाग लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा आणि स्वातंत्र्य सेनानी जमनालाल बजाज,अहिल्यादेवी होळकर ,महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना अभिवादन करून सारसबाग गणपतीची महाआरती करून रॅलीचा समारोप समारोप झाला.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांनी वाडिया महाविद्यालयानजीक खा . वंदना चव्हाण यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या .
या मिरवणुकीत मोठ्या संख्येने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी, सेल अध्यक्ष आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
