पुणे : पुण्यनगरीची शान असलेल्या व पर्यावरण, जैवविविधता यांनी नटलेल्या एम्प्रेस गार्डेनचे लचके तोडण्याचा आसुरी डाव आखणाऱ्या भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने, विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी झाडांना मिठी मारून (चिपको) आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी पक्षाच्या वतीने एम्प्रेस गार्डेन येथे करण्यात येणाऱ्या बांधकाम विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले.
यावेळी ॲग्री हाॅर्टिकल्चरल सोसायटी ओफ वेस्टर्न इंडिया संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार बापू पठारे, माजी आमदार कमल ढोले- पाटील, नगरसेवक प्रदिप गायकवाड, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नगरसेवक भय्यासाहेब जाधव, भगवान वैराट, माजी नगरसेविका सुरेखा कवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कन्टोमेन्ट मतदारसंघचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, पक्षाचे युवक अध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, विद्यार्थी अध्यक्ष ऋषी परदेशी, सुनिल बनकर, चंद्रकांत कवडे, श्वेता होनराव, जनार्दन जगताप, युसुफ पठाण, फईम शेख, सागर भोसले, संग्राम होनराव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ‘निसर्गावर घाला घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, एम्प्रेस गार्डन काय म्हणते ,फडणवीस काका मला वाचवा म्हणते’, अशा घोषणा देत पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यानी झाडाला मिठी मारून चिपको आंदोलन केले.
शासकीय अथवा निमशासकीय जागेत आपण बांधकाम करावे. एम्प्रेस गार्डन सारख्या पर्यावरणानी नटलेल्या जागेत हे बांधकाम होऊ देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने करण्यात आली.
हिरवाईने नटलेले एम्प्रेस गार्डन तोडून काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट सरकाने घातला आहे. एकीकडे सरकार झाडांची लागवड करण्याचा संकल्प करते, तर दुसरीकडे दुर्मिळ आणि जुन्या झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा र्हास करण्यास हातभार लावत आहे. सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध आम्ही या आंदोलानाद्वारे करीत आहोत’, असे चेतन तुपे म्हणाले.
एम्प्रेस गार्डन या ठिकाणी देण्यात आलेल्या बांधकामाच्या परवानगी विरोधात हे आंदोलन केलं गेले, अशी माहिती आंदोलन नियोजक राष्ट्रवादी कॉंग्रेस कन्टोमेन्ट मतदारसंघ चे अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी दिली.
या आंदोलना विषयी माहिती देताना भोलासिंग अरोरा म्हणाले, ‘एम्प्रेस गार्डन या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या शासकीय वसाहत बांधकाम विरोधात व १५० वर्ष जुनी असणारी वृक्ष तोड वाचविण्याकरिता भाजप सरकार विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.’

