पुणे-हडपसर मधील जुना कॅनॉल गटारमुक्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक योगेश ससाणे याचा नेतृत्वाखाली क्षेत्रीय कार्यालयावर आरोग्य मोर्चा काढण्यात आला. येत्या 20 डिसेंबर पर्यंत जुना कॅनॉलची परिस्थिती बदलली नाही तर २१ डिंसेबर रोजी मनपा अधिकायांना त्याच कॅनॉलमधील गटारपाण्यात बसवून अंघोळ घातली जाईल असा इशारा नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिला आहे
या मोर्चात मोठया संख्येने स्थानिक रहिवाशी सामील झाले होते. या संदर्भातील निवेदन सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अभियंता दिलीप पावरा यांनी देण्यात आले. यावेळी स्थनिक नागरिक प्रकाश पवार, अशोक धोत्रे, युवराज माळी, शुभम देवकर, विजय भिंगारे, सागर झेंडे, महेश मेमाणे, नरेश पवार, शेरु कुरेशी ,मौसिन खान, शंभु कोठावळे, नितीन ससाणे, महानंद शिंदे, डाॅ संध्या वाघचौरे, शारदा ननावरे, सिधुबाई इंगुळकर, सिंधुबाई शितकल, अनिता धोत्रे, शकुंतला पवार आदी उपस्थित होते.