वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या मागण्या केल्या मान्य
पुणे :
“शासकीय आदिवासी वसतीगृह हडपसर पुणे” येथे दि. ७पासून वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थीनी विविध मागण्यांसाठी अमरण उपोषणास बसले होते याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस चे पदाधिकारी साई होळकर, निखिल शिंदे व राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या पदाधिकारी अबोली घुले यांनी देखील उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवत त्यांच्या मागण्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. अखेर काल विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश आले.
आंदोलनांच्या सगळ्या मागण्या पुर्णपणे प्रशासनातील संबंधित आधिकारी यांनी मान्य केल्या .
पुणे शहर विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष ऋषी परदेशी,
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या विद्यार्थी व युवती पदाधिकाऱ्यांनीशासकीय अधिकाऱ्यांनाविद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठीचे लेखी निवेदन दिले. तसेच विरोधी पक्ष नेते चेतन तुपे,नगरसेवक योगेश ससाणे,नगरसेवक निलेश मगर,नगरसेवक बंडू गायकवाड यांनी देखील विद्यार्थ्यांच्या ह्या आंदोलनाला समर्थन दिले.