पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ऍड. औदुंबर खुने -पाटील (पुणे शहर उपाध्यक्ष) यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला.
अजित पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पुणे :
यावेळी सुरेश पवार, शंकर शिंदे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, श्याम ढावरे, संजय दामोदरे , अशोक जाधव, शांतीलाल मिसाळ उपस्थित होते.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने बालवाडी व आधारकेंद्रात खाऊ वाटप
पुणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघ तर्फे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर उपाध्यक्ष ऍड. औदुंबर खुने- पाटील, ‘ज्येष्ठ नागरिक सेल’चे दादा सांगळे, कार्यालयीन सचिव संजय गाडे यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आले.
इंदिरानगर लोअर, प्रेमनगर वसाहत येथील बालवाड्या तसेच आंबेडकरनगर मार्केट यार्ड येथील आधार केंद्र येथे हा कार्यक्रम झाला. मृणालिनी मदन वाणी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
यावेळी संयोजिका मृणालिनी मदन वाणी, वैशाली खोपडकर, विद्या गायकवाड, राधिका नवले, नागमनी वनमाला, शाहीन शेख, सुपेकर ताई आदी उपस्थित होते.
मार्केट यार्ड येथे वृक्षारोपण
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने वास्तूनगर , मार्केट यार्ड येथे वृक्षारोपण करण्यात आले. पर्वती विधानसभा मतदारसंघ महिलाध्यक्ष मृणालिनी मदन वाणी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.