पुणे :
‘क्लायमेट पार्लमेंट फोरम’तर्फे नवीनीकरणीय ऊर्जा या विषयावरील भारतीय संसद सदस्यांच्या जर्मनी अभ्यास दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचा समावेश झाला आहे. दि . ७ मे पासून या दौऱ्यास सुरुवात झाली आहे.
या दौऱ्यात त्यांनी ‘जर्मन पार्लमेंट’ला भेट, ‘ग्रीन पार्टी’ च्या संसद सदस्यांची आणि ‘इंडो जर्मन पार्लमेंटेरियन ग्रुप’च्या सदस्यांची भेट घेतली. स्वयंपूर्ण ऊर्जा खेड्यांना भेट दिली. पुण्यातील जर्मन कंपन्या या शहराच्या पर्यावरण प्रश्नात योगदान देतील यासाठी आपण प्रयन्त करू असे आश्वासन ग्रीन पार्टीच्या संसद सदस्य बार्बेल हॉन यांनी खा. चव्हाण यांना दिले.