पुणे: १२वीं नंतर विद्यार्थींना डॉक्टर व इंजिनियर बनण्याची इच्छा असते. त्यात काहीं विद्यार्थीचा रस यात नसतो तसेच त्यांच्या समोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. अशा वेळेस वेदिक सायन्समध्ये विद्यार्थी आपले करिअर करून भविष्य निर्माण करू शकतात.तसेच, ते या विषयात पदवीही प्राप्त करू शकतात.
याच हेतूने एमआयटी आर्ट, डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सेस , पुणे तर्फे “सिनरझायझिंग मॉर्डन एज्युकेशन विथ वेदिक सायन्सेस” विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे. हे चर्चासत्र १२वींचे विद्यार्थी. पदवीधर आणि पालकांसाठी आयोजित केले गेले आहे. शनिवार, दि.२० मे २०१७ रोजी कोथरूड येथील एमआयटी कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहामध्ये संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजता हे चर्चासत्र होईल,
या चर्चासत्रात बंगलूर येथील कर्नाटक संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू व अधिष्ठाता प्रा. श्रीनिवास वराखेडी, हैदराबादच्या इनर हॉरिझोनची संस्थापिका व सायकोथेरपिस्ट डॉ.सुजाता पोटे, मुंबई येथील आयआयटीच्या ह्यूमॉनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस विभागाचे प्रा. के.रामासुब्रमण्यम आणि एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सचे अधिष्ठाता डॉ.साई सुसरला हे मार्गदर्शन करणार आहेत.
अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे यांनी दिली.