पुणे :
पुण्यात अनेक रस्ता दुभाजकांची उभारणी अशास्त्रीय पद्धतीने झाली असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे ,दुभाजकांच्या नावाखाली फक्त सिमेंट ब्लॉक बसवले जात आहेत ,त्यामुळे सारख्या उंचीचे आणि रिफ्लेक्टर असलेले दुभाजक बसविण्याचे शास्त्रीय नियोजन ,सेफ्टी ऑडिट करावे ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे शहराध्यक्ष खा . वंदना चव्हाण यांनी मनपा आयुक्त कुणालकुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .
बाणेर रस्त्यावर मोटार रस्ता दुभाजकावर गेल्याने महिलेसह मुलीचा मृत्यू घडल्याच्या पार्श्वभूमीवर खा . चव्हाण यांनी ही मागणी केली आहे .
शहरातील सर्व दुभाजकांची उंची सारखी असावी . जेथे दुभाजक सुरु होतात तेथे बोलार्ड असावेत ,वळणाला रात्री दिसू शकणारे रिफ्लेक्टर असावेत . त्यासाठी नागरिकांकडून सूचना मागवाव्यात तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः माहिती घ्यावी ,असेही खा . वंदना चव्हाण यांनी या पत्रात म्हटले आहे .
पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करायला पेडिस्ट्रियन क्रॉसिंग ,सिग्नल ,मेडियन बे, उपलब्ध करून देणे आवश्यक आहे . दुभाजकांची उभारणी करताना इंडियन रोड काँग्रेस चे निकष लक्षात घ्यावेत . असेही त्यांनी म्हटले आहे