रमजान निमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत ‘ रोझा इफ्तार ‘ चे कोंढवा -कौसरबाग येथे आयोजन
खा . वंदना चव्हाण आणि महापौर प्रशांत जगताप यांची पत्रकार परिषदेत माहिती
पुणे :
मुस्लिम धर्मीय बांधवांचा पवित्र महिना म्हणून ओळखला जाणाऱ्या रमझान निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजन ‘रोझा इफ्तार ‘ चे आयोजन करण्यात आले आहे ,अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या खासदार आणि शहराध्यक्ष वंदना चव्हाण ,तसेच महापौर प्रशांत जगताप यांनी दिली .
रविवारी सायंकाळी महापौर निवास येथे ही पत्रकार परिषद झाली .
कोंढवा येथील कौसरबाग हौसिंग सोसायटी च्या मैदानावर २१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ‘रोझा इफ्तार ‘ आयोजित करण्यात आला आहे .
पुण्यातील सर्व धर्मीय सलोख्याचे वातावरण राखणे ,मुस्लिम धर्मिय बांधवांच्या सणात सहभागी होणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे .या रोझा इफ्तार कार्यक्रमा च्या तयारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांची बैठक रविवारी सकाळी ११ वाजता कौसरबाग येथे आयोजित करण्यात आली होती . खासदार वंदना चव्हाण ,पक्षाचे पदाधिकारी,नगरसेवक उपस्थित होते .
पक्षाचे कार्यकर्ते मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन रोझा इफ्तार चे निमंत्रण देत आहेत ,अशीही माहिती यावेळी देण्यात आली आहे .
‘सर्व धर्मीय सण एकत्रित साजरे करणे ,सलोखा वाढीस लावणे तसेच पुणे हे शांतताप्रिय ,सर्वांना बरोबर घेवून प्रगती करणारे शहर आहे ‘ हा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे ,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले
सर्व क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व पक्षीय नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.