पुणे- राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,आणि माजी उपमहापौर , प्रभाग क्रमांक ११ चे राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे, कॉंग्रेस, आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केला . यावेळी या प्रभागातील अपक्ष उमेदवार आशा भगत यांनी दीपक मानकर आणि आघाडीच्या उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर केला .
मनसेच्या अर्चना चंदनशिवे,आरती गायकवाड ,आशा जमदाडे,,बाबी कारेकर,कीर्ती पानसरे,रत्नमाला मोहोळ,
कॉंग्रेसच्या संगीता चौधरी,राजेश चौधरी,राजेंद्र उभे,राहुल म्हस्के,अतुल म्हस्के ,
भाजपचे नंदकुमार घाटे,राजाभाऊ कुलकर्णी,मोहन गायकवाड ,राजाभाऊ दिसले,अजित थोपटे ,हनुमंत कांबळे,मिलिंद कानी
यांनी यावेळी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला .