पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंह यांच्याविषयी राज्यसभेत काढलेले उद्गार अभिरूचीहीन आहेत, आणि राज्यसभेचे गांभीर्य घालवणारे आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी आज केली.
आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी ही टीका केली.
‘नोटबंदीबाबतचे निवेदन करतांना त्यांनी विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे न देता त्यांना बगल दिली आहे. रिझर्व्ह बँकेकडे किती पैसा जमा झाला? किती काळा पैसा बाहेर आला? या प्रश्नांची त्यांनी उत्तरे देणे अपेक्षित होते, मात्र डॉ.मनमोहनसिंग यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीबाबत अभिरूचीहीन संज्ञा वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाजाची पातळी सोडली,’ असे खा.चव्हाण यांनी म्हटले आहे.
खा.वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘पंतप्रधान राहिलेल्या दुसर्या व्यक्तीबद्दल बोलताना, विद्यमान पंतप्रधानांनी सभागृहाची, देशाची प्रतिष्ठा राखायला हवी होती. ती राखली गेली नाही, याबद्दल आपल्याला दु:ख होत आहे.