पुणे- एकेकाळचे सुरेश कलमाडींचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस चे खंदे नेते ,सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असलेले आणि पुण्याच्या राजकीय वर्तुळातील महत्वपूर्ण मानले जाणारे माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे सुपुत्र बापू मानकर भाजप मध्ये गेल्यानंतर आज सनी मानकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.तसेच पदवाटप व काही लोकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.या वेळी महापौर प्रशांत जगताप,खासदार वंदना चव्हाण,माजी उपमहापौर दीपक मानकर,उपसभापती शुक्राचार्य वांजळे, मिलिंद वालवडकर,विपुल म्हैसुरकर,मनाली भिलारे,आनंद रीठे,दत्ता सागरे,हर्षवर्धन मानकर,बाबुभाई शेख,गणेश माथवड,बाप्पू डाकले,राजेंद्र भगत,शुभम माताळे, गिरीश गुरनानी,किशोर कांबळे, बाळासाहेब म्होकर व आदि मान्यवर, उपस्थित होते.बाप्पू उर्फ राघवेंद्र मानकर यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश केला आहे . या पार्श्वभूमीवर आजच्या या कार्यक्रमाचे महत्व राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जाते आहे .
बाप्पुच्या भाजप प्रवेशानंतर मानकारांकडे.. अजितदादा …
Date:



