पुणे-न्यायालय, राज्यघटना, स्त्री-पुरुष समानता यापैकी काहीच भाजपवाले मानत नाहीत. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यांतून आणि कृतीतून हेच दिसतं. ‘आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा’ असा कारभार सध्या देशात सुरू आहे,’ सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वत:च्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते. ज्या व्यक्तिचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, स्त्री पुरुष समानता जे मानत नाहीत अशांच्या हाती सत्ता आम्ही राहू देणार नाही ,अशांच्या हातून राज्य हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे वक्तव्य येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं .

राष्ट्रवादी कॉंग्रेस ने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील,सुभाष जगताप ,नंदा लोणकर,अश्विनी कदम ,नितीन कदम, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पवार यांनी केंद्र सरकारसह भाजपवरही जोरदार निशाणा साधला. ‘सीबीआयमध्ये जे काही झालं. ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ते देशासाठी घातक होतं. आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा असा इशाराच सरकारनं प्रशासनाला यातून दिला, असं पवार म्हणाले. ‘सर्वोच्च न्यायालयानं सबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले. पण भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी त्या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असे निर्णय न्यायालय कसं देऊ शकतं असं शहा म्हणतात. भाजपवाल्यानं देशाची घटना, न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत हेच यातून दिसतं,’ असं पवार म्हणाले.
दुष्काळाच्या प्रश्नावरही भाजपचं सरकार गंभीर नाही. दुष्काळाच्या झळा सर्वांना बसताहेत. पण सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या या सरकारची सत्ता लोकशाहीच्या मार्गानं हिसकावून घेऊ,’ असं पवार म्हणाले.


