ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत आढळणार नाही -जिल्हाधिकारी

Date:

पुणे : यंदा प्रथमच व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मोजणी केली जाणार आहे. सर्वसाधारणपणे एका मतदान केंद्रावर बाराशे ते दीड हजार मतदान झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 120 मतदान केंद्रांमधील तब्बल दीड लाख व्हीव्हीपॅट स्लिप्सची मोजणी करावी लागेल. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधील मते यात तफावत अढळून येण्याची शक्यता नाही. उमेदवारांनी यासंदर्भात काही आक्षेप घेतले तर त्यावर कोणता निर्णय घ्यावा,याबाबतही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले .

येत्या २३ तारखेला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. निकाल कधी लागणार या बद्दलची कमालीची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. मात्र गुरुवारी (दि. २३) संध्याकाळी उशीरापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही. त्यातही व्हीव्हीपॅट चिठ्यांची मतमोजणी, उमेदवारांचे आक्षेप यावरुन वाद उद्भवल्यास निकाल आणखी लांबू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. वास्तविक ईव्हीएमवर मतदान झाल्याने मतमोजणी कमीत कमी वेळेत होणे अपेक्षित असते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, जिल्ह्यातील चार मतदार संघांचे मतदान दोन वेगवेगळ्या टप्प्यात घेण्यात आले. पुणे व बारामती मतदार संघाचे मतदान २३ एप्रिलला तर आणि शिरूर व मावळ मतदार संघाचे मतदान २९ एप्रिलला झाले. देशातल्या सर्व लोकसभा मतदारसंघांमधल्या मतदानाचा अंतिम टप्पा रविवारी (दि. १९) संपतो आहे. त्यानंतरच देशातली मतमोजणी होणार आहे. जिल्हा प्रशासनानेही मतमोजणीसाठी आवश्यक असलेली सर्व तयारी पूर्ण केली असून मतदार संघनिहाय आणि प्रत्येक टेबल निहाय कर्मचा-यांच्या नियुक्तीचे नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चारही लोकसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या चिठ्ठ्या तयार केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघांतर्गत येणा-या विधानसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रांची चिठ्ठ्यांमधून लॉटरी काढली जाईल.त्यानंतर ईव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅटमध्ये जमा झालेल्या स्लिप्स यातील मतांची पडताळणी होईल.पुणे लोकसभा सभा मतदार संघातील कसबा, शिवाजीनगर, वडगावशेरी, कोथरूड ,पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व मतदार संघातील प्रत्येकी पाच मतदान केंद्रांमधील मतांची मोजणी करण्यात येईल.त्यामुळे एका लोकसभा मतदार संघातील 30 मतदान केंद्रांची मोजणी होईल.तर चार लोकसभा मतदान केंद्रांमधील 120 मतदान केंद्रांची मोजणी करण्यात येईल.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेशवे पार्कमधील कोट्यवधींच्या शिवसृष्टीची दुरावस्था:भाजप व प्रशासन जबाबदार- शिवसेनेची निदर्शने

पुणे—पेशवे पार्कमधील कोट्यवधींची शिवसृष्टी धुळखात पडून ठेवण्यात आली आणि...

शरद पवार गटाच्या २५२ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

पुणे-आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार...

आता महात्मा गांधींचे नाव देखील हटविण्याचे कारस्थान -कॉंग्रेसचे आंदोलन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या...

महावितरण वीज कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने देणार- संचालक राजेंद्र पवार

शून्य अपघाताचे ध्येय : अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वीज कर्मचाऱ्यांसह...