Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नैसर्गिक झऱ्याची जागा आराखड्यात आरक्षित करण्याची निसर्गप्रेमींची मागणी

Date:

पुणे :

बावधन येथील पालिकेच्या हद्दीतील नैसर्गिक झऱ्याची जागा(जलस्रोत )ही शहर विकास आराखड्यात आरक्षित करून शासकीय राजपत्रात अधिसूचित करून संरक्षणाची तरतूद करण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जलदेवता सेवा अभियान,जलबिरादरी संस्थेचे शैलेंद्र पटेल यांनी ही मागणी पुणे महानगरपालिकेचे आयुक्तांकडे केली आहे. आवश्यक कार्यवाही न झाल्यास राष्ट्रीय हरित न्यायालय NGT मध्ये जाण्याची तयारी ठेवली असल्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

शैलेंद्र पटेल (जल देवता सेवा अभियान ) , सुनील जोशी (समग्र नदी परिवार ),निरंजन उपासनी (जीवित नदी ), वीरेंद्र चित्राव ( राम नदी रिस्टोरेशन मिशन ), डॉ.सचिन पुणेकर (बायो स्फीअर ) , दिपक श्रोते (वसुंधरा स्वच्छ्ता अभियान ), पुष्कर कुलकर्णी, ( वसुंधरा स्वच्छता अभियान ) ललीत राठी, वैशाली पाटकर ( भूजल अभियान ), मुकुंद शिंदे , श्यामला देसाई,उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्याच्या जल संवर्धन व जल नियोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या तीनही संबंधित संस्थांनी या संबंधीचे निर्देश पुणे पालिकेला दिले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण / भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा /उपविभागीय अधिकारी ,मावळ- मुळशी (MWRRA/GSDA/SDO) ह्या तिन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी बावधन येथील नैसर्गिक झऱ्याच्या जागेवर प्रत्यक्ष भेट देऊन तो जलस्त्रोत आहे असे घोषीत करून त्याचे संरक्षण करावे असे अधिसूचित केले आहे. त्या अनुषंगाने झऱ्याचे संरक्षण उत्तरदायित्व असलेल्या स्थानिक स्वराज संस्था म्हणजे आयुक्त मनपा पुणे यांना वेळोवेळी निर्देश व आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या या तिन्ही संस्थांनी आदेश दिले असूनसुध्दा त्या अनुशंगाने मनपा आयुक्त यांनी सदर जागा नैसर्गिक जलस्रोतासाठी शहर विकास आराखड्यामध्ये (Development Plan ) MRTP act 37 अन्वये कार्यवाही करून आरेखित करावा आणि शासकीय राजपत्रामध्ये अधिसूचित करण्याची अंबलबजावणी न करून,विलंब करून या शासकीय संस्थांच्या आदेशाचा अवमान केला आहे.या जलस्रोतांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण तर्फे बैठक आयोजित करून समिती स्थापन केली होती. त्यात पुणे मनपा आयुक्तांचाही समावेश आहे. या जलस्रोताच्या संरक्षणासाठी त्याभोवती कोणतेही बांधकाम होऊ देता कामा नये,याची कार्यवाही पालिका आयुक्तांनी करायची आहे. त्याचा कालबद्ध कार्यक्रम देण्याचे आदेश या समितीने पालिकेला दिले आहेत.या झऱ्याचे अस्तित्व संपल्यास त्याची जबाबदारी समितीची पर्यायाने पालिकेची असणार आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन )अधिनियम २००९ च्या नियमावली नुसार या परिसरात बांधकाम ,विकासकामास परवानगी देऊ नये,असे समितीने पालिकेला आदेश दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

निसर्गप्रेमी संस्थांनी या झऱ्यासाठी आणि रामनदी वाहती ठेवण्यासाठी पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील पालिकेने उत्तर दिलेले नाही,याकडेही पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले.

जलदेवता सेवा अभियान, जल बिरादरी,. समग्र नदी परिवार, सहज जल बोध, भुजल अभियान , जीवित नदी रामनदी रिस्टोरेशन मिशन, रामनदी स्वच्छता अभियान,पवना नदी वसुंधरा स्वच्छता अभियान, पुण्यातील इतर पर्यावरणीय संस्था यांचा जलस्त्रोत रक्षणात पाठिंबा आहे.सर्व प्रथम GSDA,MWRRA,v SDO mulshi च्या संस्थेने आपल्या अधिकाराचे कर्तव्य व जबाबदारी ने बावधन चा झरा नैसर्गिक जलस्त्रोत घोषित करून अधिसूचित केला त्यामुळे त्यां चे आभार मानण्यात आले.

रिपोर्ट्स

१)डेक्कन कॉलेज : बावधन च्या दुर्मिळ झऱ्याची पुरातनते चा अभ्यासपूर्ण अहवाल.
२) ईकॉलोजीकल सोसायटी ऑफ इंडिया ; बावधन च्या झऱ्याच्या आजूबाजूची संपूर्ण जागा इकॉलोजिकल सधन आहे असा अहवाल दिला आहे.
३) SANDRP चा बावधन चा दुर्मिळ झर्याचे संरक्षण करा असा आशिया खंडात शोध निबंध पब्लिश केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...