सेफ किड्स फाउंडेशन आणि पुणे अग्निशमन विभागातर्फे शहरातील 100 विद्यार्थ्यी आणि शिक्षकांना आगीपासून सुरक्षेच्या प्रक्रियांचे प्रशिक्षण देण्यात येणार
हे फायर मार्शल्स – अग्नी सुरक्षा मित्र – अग्निशमन विभागाला आगीसंदर्भातील आणीबाणीच्या प्रसंगी मदत करतील.
नॅशनल फायर सर्व्हिस वीकमध्ये संपूर्ण आठवडाभर शहरात विविध रॅली, रोड शो, अग्नीविषयक प्रात्यक्षिके, प्रदर्शने आणि पथनाट्ये सादर केली जातील.
पुणे- : नॅशनल फायर सर्व्हिस वीकच्या उद्घाटनानिमित्ताने, सेफ किड्स फाउंडेशन आणि पुणे अग्निशामन दलाने, विद्यार्थी आणि शिक्षकांसह 100 स्वयंसेवकांचा आयोजित केल्या जाणाऱ्या फायर मार्शल्समध्ये सहभाग असेल, असे जाहीर केले आहे, त्यांना अग्नी सुरक्षा मित्र म्हणून ओळखले जाईल, आणि अग्नीविषयक आणीबाणीत ते मदत करतील. अग्नीविषयक सुरक्षेच्य प्रक्रियांसाठी या स्वयंसेवकांना योग्य प्रकारे प्रशिक्षित केले जाईल आणि सेफ किड्स अॅट होम अग्नी सुरक्षा उपक्रमाची सांगता केली जाईल.
हनीवेल इंडिया ग्रांटतर्फे निधी उपलब्ध झालेला हा सेफ किड्स अॅट होम हा सुरक्षा उपक्रम, पुण्यातील 14 वर्षांखालील मुलांचे भाजणे आणि पोळणे यासारख्या घटनांना प्रतिबंध आणि घट करण्यास मदत करतो. या उपक्रमात अत्याधुनिक, प्रायोगिक आणि धमला अशा शैक्षणिक सामग्रीच्या साहाय्याने विविध वयोगटांचा वापर केला जाणार आहे, यासह 2018 सालापर्यंत 425,000 मुले आणि 250,000 पालकांपर्यंत पोचण्याचा मानस आहे.
स्वयंसेवकांच्या पहिल्या बॅचची ओळख करून देताना, पुण्याच्या अग्निशामन दलाचे प्रमुख फायर अधिकारी श्री. प्रशांत रणपिसे म्हणाले की, “ या उपक्रमाच्या `जीवन आणि मालमत्तेच्या बचतीसाठी तुम्ही आमचे भागीदार
या थीमवर आधारित यंदाच्या फायर सर्व्हिस वीकमध्ये योग्य प्रकारे अग्निशामन दलाच्या जवानांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहेय आमचे अग्नीशी खेळणारे जवान त्यांचे जीवन धोक्यात घालत असतात, आणि
यामुळेच 100 अग्नी सुरक्षा मित्र हे केवळ आमच्या मनुष्यबळाची ताकद वाढवणारेच नाहीत तर आमच्या बाजून उभी राहणारी ही तरूण फळी आहे आणि ती आमच्याबरोबर कार्य करणार आहे
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (पीसीएमसी) प्रमुख फायर अधिकारी श्री. किरण गावडे म्हणाले की, “पीसीएमसी यंदा पुणे अग्निशामन विभाग आणि सेफ किड्स फाउंडेशन यांच्याबरोबर शहरातील लोकांपर्यंत अधिक मोठ्या प्रमाणावर जागरूकता करण्याचा प्रयत्न करत आहे, याचा मला आनंद झाला
आहे. पुणे महापालिकेला जवळचा भाग असल्याने, पीसीएमसीनेही हा उपक्रम राबवणे साहजिकच होते. या उपक्रमामुळे आत्मविश्वास बळावण्याबरोबरच, या जलद गतीने विकसित होणाऱ्या जुळ्या शहराच्या मनोधैर्यात आणि सुरक्षेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होणार आहे. सेफ किड्स फाउंडेशनच्या उपक्रम संचालक डॉ. सिंथिया पिंटो म्हणाल्या की, “प्रशिक्षणार्थी विद्यार्थी अग्नी
सुरक्षा मित्र म्हणून कार्यरत होणे, हे पुणे शहर आपल्या मुलांसाठी अधिक सुरक्षित शहर होण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमासाठी पाठिंबा दिल्याबद्दल पुणे आणि पीसीएमसी अग्नीशामन
विभागाचे आम्ही आभारी आहोत, आणि आमच्या राष्ट्रीय फायर सर्व्हिस वीकअंतर्गत जागरूकता उपक्रमात त्यांच्या संलग्नितेने आम्ही आनंदित झालो आहोत
नॅशनल सर्व्हिस फायर वीकचे आयोजन 14 ते 20 एप्रिलदरम्यान करण्यात आले आहे. अग्नीसुरक्षेसाठीचे संदेश सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्यात येतील, खास करून हॉस्पिटले, पुणे रेल्वे स्टेशन आणि बस थांबे, मॉल आणि मल्टीप्लेक्स आदी ठिकाणी हे संदेश दिसतील. यामध्ये विविध रॅली, पथनाट्ये, सामाजिक जागरूकता उपक्रम, प्रदर्शने आणि पॅम्पलेटचे वितरण याद्वारे नागरिकांना आगीच्या धोक्यांबाबत प्रशिक्षित केले जाईल आणि अशा घटनांना प्रतिबंध कसा करायचा हेही शिकवले जाईल.
हनीवेल इंडियाचे अध्यक्ष श्री. विकास चड्डा म्हणाले की, “हनीवेलला विकास आणि तंत्रज्ञान तैनात करण्याचा दशकभराचा अनुभव आहे, याद्वारे कुटुंबांना त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित ठेवले
जाते. सेफ किड्स फाउंडेशनबरोबरच्या आमच्या भागीदारीतून, आमच्या शहरात पुणे हे मुलांसाठीचे सुरक्षित शहर आहे याचे मॉडेल तयार करण्याची आमची ईच्छा आहे. नॅशनल फायर सर्व्हिस वीक प्रत्येक वर्षी आयोजित केला जातो, आपले कर्तव्य बजावताना जीवन गमवावे लागलेल्या अग्नीशामन सेवेतील जवानांच्या स्मरणार्थ याचे आयोजन केले जाते आणि दरवर्षी अग्नीच्या
धोक्यांबाबात लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

