पुणे: संपूर्ण देशात भाजपच्या स्थापना दिनाचा जल्लोष सुरू असतानाच प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या खास शैलीत भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. काँग्रेसच्या काळात काहीच झालं नाही असं म्हणू नका. सगळ्याच पक्षात चांगले आणि वाईट लोक असतात. त्यामुळे कोण काय करतो, हे सर्वांना माहित आहे, असा टोला नाना पाटेकर यांनी भाजपला लगावला आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना नाना पाटेकर यांनी भाजपला हा टोला लगावला. ‘राजकारणी झुंजवतात आणि आपण झुंजतो. बाकीच्या देशात काय परिस्थिती आहे हे आपण पाहतच असतो, आपल्या देशात लोकशाही टिकून आहे हे काय कमी आहे का?,’ असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणार असल्याचं वारंवार सांगितलं जातं. हमीभाव म्हणजे ट्रम्प कार्ड नाही. केवळ निवडणुकीसाठी हमीभावाचं आमिष दाखवू नका. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिलाच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
‘काँग्रेसने देशात लोकशाही टिकवून ठेवली ‘ नाना पाटेकर
Date: