पुणे-केदार फ्रेंड्स सर्कल,हिंगणे व नगरसेविका.सौ.मंजुषा नागपुरे यांनी आयोजित केलेल्या दही हंडी उत्सवामध्ये अंध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून, दही हंडी फोडण्याचा आनंद लुटला. किष्किंधा प्रतिष्ठान संचलित अंध वसती गृहातील 25 अंध विद्यार्थ्यांनी हा आनंद लुटला. ‘चलो जलाए दीप जहाँ, अब भी अंधेरा हे’ ही संघ संस्काराने दिलेली शिकवण, म्हणूनच अंध विद्यार्थ्यांमध्ये आनंद वाटण्यासाठी, त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठी या हंडीचे आयोजन केल्याचे सौ.नागपूरे म्हटल्या.यावेळी, या विद्यार्थ्यांना हंडी फोडण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी, श्री.दीपक नागपुरे व आयोजक श्री.समीर महाडिक यांनी उपस्थित लोकांना चायनीज वस्तू न वापरण्याची शपथ दिली. चालू विकृत स्वरूपाला फाटा देऊन, एक नवीन आदर्श उपक्रम सिंहगड रस्त्यावर सुरू केल्याबद्दल केदार फ्रेंड्स सर्कल चे लोकांनी आभार मानले व समाधान व्यक्त केले .यावेळी, अभिनेते गिरीश परदेशी उपस्थित होते.त्यांनी केदार च्या या उपक्रमाचे कौतुक केले .शिवशार्दूल ढोल ताशा पथकाचे वादन हे देखील कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमेश चव्हाण उपस्थित होते .
कार्यक्रम हिंगणे खुर्द, सिंहगड रोड येथे संपन्न झाला . कार्यक्रमाची मुख्य दही हंडी बारामती गोविंदा पथकाने फोडली । कार्यक्रमाची सांगता सामूहिक शिववंदना ने करण्यात आली. महेश वैद्य, मयूर पांगारे, ओंकार वैरणकर, विशाल अवघडे, संदीप कदम, मंगेश बुजवे , आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली
अंध विद्यार्थ्यांच्या हस्ते दही-हंडी फोडली; मंजुषा नागपुरे यांचा उपक्रम’
Date:

