पुणे-
दि. १६ ऑगस्ट मंगळवार २०१६ रोजी रात्री ९.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरुड, पुणे येथे स्वतः प्रसिध्द संगीतकार नदिम-श्रवण जोडीतील श्री श्रवणजी पुण्यात प्रथमच त्यांच्या गाण्यांचा कार्यक‘म सादर करणार आहेत व त्यांच्या संगीतप्रवासाबद्दलचे त्यांचे अनुभव सांगणार आहेत. आशिकी ह्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या ह्या संगीतकार जोडीचा शो पुण्यात प्रथमच होत आहे. १० वादक, ९ गायक व ३ सूत्रसंचालक नदिम श्रवण जोडीची सांगीतिक वाटचाल सर्व पुणेकरांसाठी सादर करणार आहेत.


