सावधान …जीवघेण्या रस्त्याची होतेय निर्मिती -अवघ्या काही मतांसाठीचे राजकारण

Date:

 
पुणे- धनकवडीतील क्रांतिसूर्य म. फुले चौकात डोंगर फोडून अक्षरशः जीवघेण्यारस्त्याची निर्मिती होताना लोक उघड्या डोळ्याने पाहत आहेत. विरोध म नात आहे पण  कोणीही बोलायला पुढे यायला नको म्हणतेय ..बहुधा धनकवडीकर येथे कोणाचा जीव जाण्याची वाट  पाहत असावेत . अशा परिस्थितीत  ‘मायमराठी ‘ ने याबाबत  लोकांकडे जावून त्यांची मते जाणून घेतली .
वीस वर्षापूर्वीचे  सुमारे साडेतीनशे घरांचे संकुल -पद्मावती नगर ;ज्याला अगोदरच सुरुवातीपासून रस्ता आहेच. पण हा रस्ता संभाजीनगर मधून जातो म्हणून या संकुलातील काहींना वेगळा रस्ता हवा आहे . आणि तो थेट फुले चौकात म्हणजे ३ हत्ती चौकात जाणारा हवा आहे . याच दृष्टीने येथे चक्क डोंगर फोडून महापालिकेच्या क्रीडासंकुलालगत  म्हणजे चौकापासून १५ मीटर च्या अंतरावर थेट वास्तव्यात असलेल्या वाहतुकीच्या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरु आहे .ज्या पद्मावती नगर साठी हा रस्ता होत असल्याचा फलक येथे भाजपच्या नेत्यांनी लावला आहे त्या पद्मावती नगर मधून  या रस्त्याला येणारी वाहने आणि निर्मल पार्क, चव्हाण नगरकडून गुलाब्ननगर  ,धनकवडी,कात्रज कडे जाणारी वाहने यांच्यात वारंवार  अपघात करणारा हा रस्ता ठरेल हे सर्व जणन सांगत आहेत पण विरोधाला मात्र पुढे येईनासे झालेत .अनेक राजकारणी लोकप्रतिनिधींना देखील हे समजते आहे. पण यास विरोध करायचा म्हणजे पद्मावती नगर मधील हजार मतांचा अव्हेर करायचा अशी धारणा झाल्याने ते सारे चूप आहेत . तर जे रस्ता करतात त्यांना मात्र,या सोसायटी ला  रस्ता करून दिलाय ..येथील हजार मते आपणास मिळतील अशी आशा असु शकणार आहे.
लोकांचा सर्वांचाच या रस्त्याला विरोध आहे पण कशाला भानगडीत पडायचे ..अशी मनोवस्था दिसून येते आहे .महापालिकेतील पथविभाग प्रमुख व्ही जी कुलकर्णी यांनी २ दिवस याबाबत संपर्क करूनही प्रतिसाद दिला नाही तर महापालिकेतील वाहतूक नियोजन प्रमुख श्रीनावास  बोनाला यांनी मात्र या रस्त्याबाबत पथ विभागाने आपला अभिप्राय घेतलेला नसल्याचे स्पष्ट केले. आपणास जर त्यांनी याबाबत अभिप्राय मागितला तर अपघात होणार नाही अशा पद्ध्तीच्या रस्त्याच्या नियोजनाबाबत आपण अभिप्राय देवू असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान जिल्हाधिकारी नवलकिशोर राम ,महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे लक्ष या बाबत मायमराठी ने वेधले आहे.
अशा स्थितीत धनकवडीतील राष्ट्रवादीच्या अप्पा परांडे यांनी ‘मायमराठी’कडे आपली भूमिका स्पष्ट केली आणि हा रस्ता झाला तर अनेकांचे जीव जातील .त्यामुळे हा रस्ता करू नये त्याचे काम ताबडतोब थांबवावे अशी मागणी केली . शिवसेनेचे जुने जानते कार्यकर्ते अनिल बटाणे यांनी तर अशा जीवघेण्या रस्त्याचे काम थांबवा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा महापालिकेला दिला आहे. t
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...