पुणे,: भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन निमित्ताने बहीण भाऊला राखी बांधते आणि भाऊ बहिणींचे आयुष्यभर रक्षण करतो त्याच प्रमाणे आपण पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावून झाडांचे आयुष्यभर रक्षण केले पाहिजे असा संकल्प करून निसर्गप्रेमी नगसेवक महेश वाबळे यांच्या पुढाकारातून तळजाई टेकडीवर झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला.यावेळी सहावीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्या आर्यजीत गाडवे (वय.11 ) या मुलाने रक्षाबंधन निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण रक्षाबंधन असा संदेशदिला. यावेळी नगरसेवक महेश वाबळे,निलय कांबळे, गोपीनाथ घाडगे, गोरख पवार,निलेश झगडे, अभय गावडे,संगमेश यादवाड,नरेंद्र गम, कांतीलाल ओसवाल तसेच फॉरेनजेश ग्रुपचे मिहीर लिमये, स्मिता गोधलेकर, श्रुती देशमुख, वेदांत बोबर्डीकर, निल गोखले इ. उपस्थित होते.

पोलीस बांधवांसमवेत रक्षाबंधन
कोरोना महामारी काळात पोलिसांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले या पोलिस बांधवांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा स्वराज्य प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रमाचे हो १२ वे वर्ष आहे
बहीण-भावाचे अतूट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. भाऊ बहिणीच्या या अजोड नात्याला अधिक वृद्धिंगत करण्यासाठी तसेच कोरोना महामारी काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या सहकारनगर पोलीस स्टेशनमधील पोलिस बांधवांना राख्या बांधून कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम नगरसेवक महेश वाबळे आणि स्वराज्य प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
कोरोनामुळे सर्वच सण-उत्सवावर बंधने आली असतानाच संसर्गाच्या भीतीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व नातेवाइकांकडे येणे-जाणे देखील बंद होते, मात्र, लॉकडाउनच्या पहिल्या दिवसापासून कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पोलिस प्रशासन अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत होते. दरम्यानच्या काळात घरापासून दूर कर्तव्य बजावताना रक्षाबंधन हा जिव्हाळ्याचा सणही त्यांना बहिणीकडे जाऊन साजरा करता आला नाही. ‘आधी कर्तव्य, मग सण-उत्सव’, ही भावना जपत पोलिसांनी लॉकडाउनच्या काळात चौका, चौकात आणि रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवला होता.
मागील काही दिवसांपासून निर्बंध शिथिल झाल्यामुळे उत्साह दिसून येत असला तरी संकट अजूनही टळले नाही, त्यामुळे पोलिसांना अजून कडक बंदोबस्त आणि सतर्कता बाळगावी लागत आहे, पर्यायाने आजही बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही, अशा पोलिस बांधवांना स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे राखी बांधून सण साजरा केला यामुळे पोलिसही भारावून गेले.
यावेळी भारती अवघडे , संगीता मोरे ,संध्याताई नांदे , सारिकाताई ठाकर ,उषा अवघडे उपस्थित होते.

