पुणे, दि. 03 : मुठा नदीला पुर आल्याने सिंहगड रोड परिसरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे बुधवारी (दि. 03) दुपारी 4 च्या सुमारास सुरक्षिततेच्या दृष्टीने आठ रोहित्राचा वीजपुरवठा तात्पुरचा बंद करण्यात आला आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर या रोहित्रांचा वीजपुरवठा पुर्ववत करण्यात येईल.असे महावितरण ने कळविले आहे
आज दुपारनंतर मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. त्यामुळे पर्वती विभागांतर्गत एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. तळमजल्यात असणार्या वीजयंत्रणेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी आज दुपारी 4 च्या सुमारास या परिसरातील 8 रोहित्रांचा वीजपुरवठा सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तात्पुरता बंद करण्यात आला. या रोहित्रांवरून सुमारे 1800 वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. पुराचे पाणी ओसरल्यानंतर बंद केलेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात येणार आहे. दरम्यान मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. गणेश लटपटे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दिलीप कोकणे यांनी परिसराला भेट देऊन वीजयंत्रणेची पाहणी केली.
संततधार पावसाचा जोर वाढत असला तरी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वीजपुवठा सुरळीत आहे. आज वानवडी, एनआयबीएम रोड, बिबवेवाडी आदी परिसरात सकाळच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला रोहित्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तसेच वीजपुरवठा खंडित असल्याच्या काही वैयक्तिक तक्रारी वगळता वीजपुरवठा सुरळीत आहे.
————————————————–
वीजग्राहक दिनात सात तक्रारी निकाली
पुणे, दि. 03 : महावितरणच्या दरमहा वीजग्राहक तक्रार निवारण दिनाच्या उपक्रमात बुधवारी (दि. 3) पुणे परिमंडलातील विभागीय कार्यालयांत प्राप्त झालेल्या एकूण 14 पैकी सात तक्रारी तत्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित सात तक्रारींच्या निवारणासाठी संबंधित उपविभाग कार्यालयांकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सर्व विभाग कार्यालयांत ग्राहक तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येत आहे.