पुणे-संगीतकार नरेंद्र भिडे यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. आज पहाटे (10 डिसेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देऊळ बंद, पाऊलवाट अशा अनेक मराठी चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाजली आहेत.
नरेंद्र भिडे यांनी पेईंग घोस्ट, देऊळ बंद, बायोस्कोप, रानभूल, चि व चि सौ का, हम्पी, उबंटू, लाठे जोशी, पुष्पक विमान, 66 सदाशिव, मुळशी पॅटर्न यासारख्या सिनेमांतील गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले. सरसेनापती हंबिरराव मोहिते हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

