कोरोना काळात राबलेल्या वादकांच्या हातांनी केले वाद्यपूजन

Date:

वंदे मातरम संघटना युवा वाद्य पथक, शिववर्धन वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथकाच्या वतीने आयोजन

पुणे : वंदे मातरम संघटना कृत युवा वाद्य पथक, शिववर्धन वाद्य पथक आणि शिवसाम्राज्य वाद्य पथक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध ढोल-ताशा पथकांच्या वाद्यांचे एकत्रित अभिनव वाद्यपूजन करण्यात आले. मंगळवार पेठेतील स्व-रूप वर्धिनीच्या सभागृहात झालेल्या वाद्यपूजनावेळी रमणबाग शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, वंदे मातरम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे, ऍड. अनिश पाडेकर, स्वरूपवर्धिनीचे निलेश धायरकर, केतन कंक, अक्षय बलकवडे आदी उपस्थित होते.

कोरोना काळात अविरतपणे झटणाऱ्या जिगरबाज हातांनी हे वाद्यपूजन झाले. नूमवि वाद्य पथक ट्रस्ट, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, नादब्रह्म ढोल-ताशा व ध्वज पथक ट्रस्ट, नादब्रह्म ट्रस्ट, मातृभूमी प्रतिष्ठान, स्व-रूप वर्धिनी, रमणबाग युवा मंच ट्रस्ट, शौर्य वाद्य पथक, गजलक्ष्मी वाद्य पथक, ज्ञानप्रबोधिनी, अखिल मोहन नगर मित्र मंडळ ट्रस्ट, शिवसूर्य प्रतिष्ठान, रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट या पथकातील वादकांचा यात समावेश होता.

प्रसंगी वैभव वाघ म्हणाले, “कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून ढोल-ताशांचा आवाज दुमदुमलेला नाही. मात्र, ढोल-ताशांवर सूर-ताल-लय पकडणाऱ्या या हातांनी कोरोना संकटकाळात जिगरबाज कामगिरी केली आहे. गरजूंना अन्नधान्य व वैद्यकीय मदत, प्लाझ्मादान मोहीम, बेड आणि औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन बँक, कोविड मृतांचा अंत्यविधी, लसीकरण मोहीम यामध्ये ढोल-ताशा पथकातील हजारो हातांनी भरीव योगदान दिले आहे. या सर्व पथकांच्या सामाजिक कार्याचा अहवाल लवकरच लिखित स्वरूपात मांडला जाणार आहे.”

“दरवर्षी हे वाद्यपूजन प्रसिद्ध व्यक्ती आणि सेलिब्रिटींच्या हस्ते होते. मात्र, यंदा हे वाद्यपूजन अभिनव पद्धतीने करण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेत लॉकडाऊन काळात अव्याहतपणे कार्यरत राहिलेल्या जिगरबाज पथकांच्या आणि वादकांच्या हस्ते हे पूजन झाले. अडचणीच्या काळात समाजाच्या मदतीला धावून जाण्याची सार्वजनिक गणेशोत्सवाची शिकवण अबाधित ठेवणाऱ्या विघ्नहर्ता बाप्पाचा कार्यकर्ता असलेली वादक सेना यंदा ढोलवादन करणार नसली, तरी सामाजिक कार्याचा निनाद कायम ठेवणार आहे,” असेही वाघ यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचे फोन पण प्रशांत जगताप यांनी निवडला काँग्रेसचा मार्ग

काँग्रेसमध्येही अस्वस्थता हि भाजपाने पेरलेली बातमी भाजपाला साथ देणाऱ्यांना...

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...