‘त्या’ तरुणीची हत्या कि आत्महत्या : मंत्र्याच्या संदर्भात खरे खोटे काय ?

Date:

भाजपा महिला आघाडीचा पुणे पोलिसांना सवाल – अर्चना पाटलांकडून आंदोलनाचा इशारा

पुणे- सोशल मिडिया वर चर्चा असलेली पूजा चव्हाण हिने खरेच कोणा मंत्र्याच्या कारणावरून आत्महत्या केली काय ? हि हत्या आहे कि आत्महत्या ? असे विविध प्रश्नांवर पुणे पोलिसांनी वेळीच खुलासे करणे गरजेचे आहे अशी मागणी आज भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. या वेळी नगरसेवक सुशिल मेंगडे,धनराज घोगरे,महिला अघाडी सरचिटणिस गायत्री भागवत,सौ . सोनाली शितोळे भोसलेप्रसिद्धीप्रमुख पुणे शहर महिला मोर्चा शहर उपाध्यक्षा अश्विनी मारणे(पवार),प्रकोष्ट रणराघिणी ,वृक्षाली दुबेव इतर पदाधिकारी उपस्थित होते

या संदर्भात अर्चना पाटील यांनी सांगितले कि,’पुण्यातील महंमदवाडी,हडपसर परिसरात रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी सदर परिसरातील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन पुजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे …. नक्की ही आत्महत्या आहे की हत्या ….? या बाबतची तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे व पोलिस आयुक्तालय पुणे शहर यांना निवेदन देण्यात आले आहे सदर प्रकरण झाल्याचे कळल्या नंतर नागरिकांनी पुजा ला उपचारा साठी रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु गंभीरपणे जखम झाल्यामुळे पुजाचा दुर्दैवी मृत्यू झाला …. या प्रकरणात असे समोर येत आहे की महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधातून या युवतीने आत्माहत्या केल्याची चर्चा समाज माध्यमांवर ( सोशल मिडीया ) सुरु आहे त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सदर प्रकार हा अतिशय गंभीर असुन त्या साठी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हावी आणि सदर प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करुन त्यांच्या कठोर शासन करावे.अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई चालु करावी .. नाही तर शहर भर तीव्र जनआंदोलन करण्यात येईल असाही इशारा यावेळी त्यांनी पोलिस प्रशासनाला दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...