पोस्टकोविड रुग्णांसाठी महापालिकेची आता ऑक्सिजन लायब्ररी!

Date:

पुणे – कोरोनातून बरे होऊन घरी गेल्यानंतर काही रुग्णांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. अशावेळी या रुग्णांना पुन्हा ऑक्सिजन देण्याची गरज भासत आहे. या एका कारणासाठी संबंधित रुग्णाला पुन्हा रूग्णालयात दाखल करावे लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर’ लायब्ररी हा उपक्रम सुरू केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे रुग्णाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्याघरी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यासाठी देण्यात येणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना वापरण्यास देण्यासाठी या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे.या लायब्ररीमधून आवश्यक त्या रुग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी किंवा रुग्णालयामध्ये पाच किंवा दहा लीटरचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरण्यास देण्यात नि:शुल्क उपक्रमपुणे शहरातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणारा महापालिकेचा हा उपक्रम नि:शुल्क स्वरूपात आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या ताब्यात सीएसआर फंडातून मिळालेले 120 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहेत. आजपासून महापालिकेच्या या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची आवश्यकता आहे, अशा रुग्णांसाठी महापालिकेच्या गाडीखाना येथील डॉ. कोटणीस आरोग्य केंद्रात ही लायब्ररी 24 तास सुरू राहणार आहे.येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठीच्या अटी
– नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन
– रुग्णाचा कोड पॉझिटिव्ह रिपोर्ट किंवा संशयित कोविड
– डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी किती दिवसांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा उपयोग करण्यास सांगितला याची माहिती
– रुग्णाचे हमीपत्र
– रुग्णाचा संपूर्ण निवासी पत्ता व त्याचा पुरावा, इलेक्ट्रिक बिल व आधार कार्ड

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला, अनेकांचा मृत्यू

पाकिस्तानच्या लष्कराने रविवारी पहाटे अफगाणिस्तानच्या सीमेवरील भागात हवाई हल्ला...

बदलापुरात ‘स्त्री बीज’ तस्करी टोळीचा पर्दाफाश:सूत्रधारासह तिघी गजाआड.

बदलापूर : येथे आंतरराज्यीय स्त्री बीज (एग सेल)...

बुधवार पेठेतील पापा शेख उर्फ बाबू भैय्या टोळीचा पर्दाफाश

पुणे: मानवी तस्करी, बोगस भारतीय ओळखपत्रे, जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे,...

‘कुरकुरे’ देण्याचे आमिष दाखवून चिमुकलीवर अत्याचार; पुणे रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

माणुसकीला काळीमा फासतेय पुण्यातील गुन्हेगारी.. पुणे :कुटुंबीयासोबत प्लॅट फॉर्मवर...