सर्वाधिक उत्पन्न देणारा प्रथम क्रमांक बांधकाम विभागाला ..तब्बल २००२ कोटी रुपये उत्पन्न
पुणे- कोरोना काळामध्ये मागील दोन वर्षात सर्वच उद्योगांबरोबर बांधकाम व्यवसायाला झळ बसली असली तरी दुसर्या लाटेनंतर हा व्यवसाय पुर्वपदावरयेऊ लागल्याचे दिसून येत आहे.पालिकेचे उत्पन्न ६ हजार कोटी रुपयांपुढे
महापालिकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ६ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले आहे.
यामध्ये उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या बांधकाम विभागातून २ हजार कोटी, मिळकत करातून १ हजार ८४६ कोटी,जीएसटीच्या हीश्यापोटी १ हजार ८५० कोटी, शासनाकडून मुद्रांक शुल्क, LBT तसेच मालमत्ता विभागाकडून सुमारे २०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यंदा प्रथमच पाणी पुरवठा विभागाने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडत 121 कोटी 68 लाख रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे.
कोरोनासारख्या प्रतिकुल परिस्थितीतही बांधकाम विभागाने गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिकचे उत्पन्न मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कामध्ये दिलेली सवलत तसेच नवीन बांधकाम नियमावलीची अंमलबजावणी यामुळे पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाला २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल २ हजार २ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे स्थायी समितीने घालून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा हे सुमारे १७० टक्के उत्पन मिळाले असून हे उत्पन्न आतापर्यंतचा उच्चांक ठरले आहे.महापालिकेच्या २०२१-२२ यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये १ हजार १८५ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले होते. २०१६-१७ या वर्षापासून बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उत्पन्न सहाशे ते सातशे कोटी रुपयांपर्यंत मर्यादित होते . मार्च २०२० मध्ये कोरोना आणि लॉकडाउनचा फटका या क्षेत्राला बसला. यामुळे हे उत्पन्न ५०७ कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते. दरम्यान, मागीलवर्षी राज्य शासनाने युनिफाईड डीसी रुल्स लागू केले. तसेच ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिल्याने बांंधकाम परवानगीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव दाखल झाले. या आर्थिकवर्षात नवीन ६९८ प्रस्तावांसह २ हजार ७७५ बांधकाम प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यातून बांधकाम विभागाला २ हजार २ कोटी रुपये महसुल मिळाला आहे.यासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले, की उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असून नवीन बांधकाम परवानगी देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या २०१७ च्या बांधकाम विकास नियमावलीमध्ये बाल्कनी, जिना यावर आकारण्यात आलेले शुल्क रद्द करण्यात आले होते. तसेच टेरेस, पॅसेज, लिफ्ट यासाठी आकारण्यात येणारे शुल्क प्रिमियम शुल्क म्हणून उत्पन्न मिळत होते. राज्य शासनाने २०२० मध्ये युनीफाईड बांधकाम नियमावली लागू करताना पी लाईन संकल्पना सुरू केली. तसेच मूळ एफ.एस.आय. वर रेडी रेकनर दराच्या १५ टक्के शुल्क आकारून ऍन्सिलरी एफ.एस.आय. ही संकल्पना नव्याने अंतर्भुत केली आहे. यामुळे उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागला आहे.पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांमध्ये पीएमआरडीएच्यावतीने बांधकाम परवानग्या देण्यात आलेल्या आहेत. या परवानगीपोटी पीएमआरडीएला ३०० कोटी रुपये महसुल मिळाला आहे. या गावांमध्ये मुलभूत सुविधा महापालिकेच्यावतीने देण्यात येत आहेत. या गावांमध्ये मुलभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी पीएमआरडीए कडून या गावांतील बांधकाम शुल्कापोटी मिळालेले ३०० कोटी रुपये महापालिकेला मिळावेत,यासाठी शासन स्तरावर पत्रव्यवहार सुरू आहे.

यंदा प्रथमच पाणी पुरवठा विभागाने 100 कोटी रुपयांचा आकडा ओलांडत 121 कोटी 68 लाख रुपये इतके उत्पन्न मिळविले आहे. सरकारी कार्यालयांकडील थकबाकी वसुलीचा यामध्ये मोठा वाटा असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. पाणी पट्टी विभागाचे एका वर्षातील हे सर्वाधिक उत्पन्न आहे. यामध्ये प्रामुख्याने मीटर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या अस्थापणाकडील थकबाकी वसुली मुळे हे उत्पन्न वाढले आहे.यासंदर्भात माहिती देताना अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की पाणी पुरवठा विभागाला आतापर्यंत दरवर्षी 80 ते 90 कोटी रुपये उत्पन्न मिळते. मागील वर्षी 96 कोटी तर त्या अगोदरच्या वर्षी 92 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
यावर्षी उत्पन्न वाढीसाठी लोक अदालत, अभय योजना राबविण्यात आली होती. तसेच शासकीय कार्यालयांकडे असलेल्या थकबाकी वसुलीसाठी अभियंते आणि मीटर निरीक्षकांनी विशेष मेहनत घेतली. दोन्ही कॅन्टोन्मेंट महावितरण, पोलीस विभागासोबत अन्य कार्यालयांकडे असलेली थकबाकी बऱ्या पैकी वसूल करण्यात आली.१२१.६८ कोटी उत्पन्न प्राप्त करून मनपा चे उत्पन्न वाढविण्यासाठी खारीचा वाटा उचललेला आहे.
हा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पाणी पुरवठा विभागाचा उच्चांक आहे (मागील सर्वाधिक उत्पन्नापेपेक्षा २०% हुन अधिक).माझ्या मीटर रीडर पासून अधीक्षक अभियंत्या पर्यंत सर्व जणांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्याचे हे फळ आहे. असेही पावसकर यांनी म्हटले आहे .

