महापालिकेचे अधिकार सरकारला हिसकावू घेऊ देणार नाही -उज्वल केसकर

Date:

PMRDA ने मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केली

पुणे-महापालिकेत २३ गावे समाविष्ट करून त्या गावांचा विकास आराखडा करण्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादीत सुरु असलेली राज्य सरकार विरुद्ध पुणे महापालिका अशी रस्सीखेच वेळोवेळी वेगवेगळे रूप धारण करणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील जुने जाणते विरोधीपक्षनेते उज्वल केसकर यांनीही आपल्या पातळीवर राज्य सरकारविरोधात शड्डू ठोकले असून कोणत्याही परिस्थितीत आम्ही महापालिकेचे अधिकार राज्य सरकारला हिसकावू देणार नाही असा पवित्रा जाहीर केला आहे.

या संदर्भात केसकर यांनी असे म्हटले आहेकी , MR&TP Act नुसार प्रारूप विकास आराखडा तयार करण्यासाठी काल मर्यादा घातली आहे ही कालमर्यादा संपल्यानंतर प्रारूप विकास आराखडा हा सहसंचालक पुणे विभाग यांच्याकडे हस्तांतरित झाला आहे, तरी देखील मुख्यमंत्र्यांच्या समोर आराखड्याचे सादरीकरण करून आम्ही कायदा मानत नाही असे PMRDA ने दाखवून दिले आहे.

नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींमधून निवडून द्यायच्या 32 जागा रिकाम्या ठेवून केवळ शासकीय अधिकारी आणि पुणे जिल्ह्याशी संबंधित नसलेले आमदार आणि खासदार यांचा समावेश करून त्यांच्या मान्यतेने हा प्रारूप विकास आराखडा मान्य झाला आहे, असे वृत्तपत्रातील बातम्या वरुन कळते आणि हे जर खरे असेल तर ही लोकशाहीची शोकांतिका आहे. कायदा करणाऱ्यांनीच कायदा मोडायचा हे योग्य नाही याविषयी आम्ही हायकोर्टामध्ये PIL दाखल केली आहे त्याची सुनावणी प्रलंबित असताना घाईघाईने हा विषय मंजूर केला,पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महापालिकेतील समाविष्ट २३ गावांचा विकास आराखडा पुणे महानगर पालिकेला करू द्यावा ही मागणी केली असताना पालकमंत्री अजित दादा पवार यांनी तुम्ही सूचना द्या अशी सूचना केली. हि गंभीर बाब आहे महानगरपालिकेत समाविष्‍ट तेवीस गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे अधिकार महानगरपालिकेला आहे. शासनाने 74 व्या घटना दुरुस्तीचा देखील भंग केलेला आहे.
निवडणुकीसाठी तेवीस गावे महानगरपालिकेत समाविष्ट करणे आणि विकास आराखडा PMRDA ने करणे यावरून सरकारची नियत दिसून येते.आम्याही बाबत शासकीय अधिसूचना आल्यानंतर पुढची कृती करू.कुठल्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार सरकारला हिसकावून घेऊ देणार नाही हा आमचा निर्धार पक्का आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजेच्या कामातील एक चूक तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते – राजेंद्र पवार

महावितरण मध्ये 'लाईनमन दिवस' उत्साहात साजरा पुणे, दि. ५ मार्च,...

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...