मुंबई : महाराष्ट्रातील मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अक्षरशः क्रांतीकारकांची देखील नीटशी ओळख राहिली नसल्याची घटना काल पुढे आली भगत सिंग यांचा मुळ फोटोला सुखदेव यांचे नाव देवून त्यांनी हे स्पष्ट करून दाखविले म्हणजे इथे भगतसिंग यांचे २ फोटो लावले एकाला भगतसिंग आणि दुर्या भगतसिंगच्या प्रतिमेला सुखदेव मानून. सुख्देव्चा फोटो लागलाच नाही . विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिमांचे डोळे झाकून पूजन केल्याचे निष्पन्न झाले आहे . अर्थात त्यांनी आदरांजली वाहिली पण हा फरक त्यांच्या हि लक्षात कसा आला नाही हे कोडे आहेच . एवढेच नव्हे तर अशाच फोटोसह राज्यशासनाच्या ‘महान्युज ‘ ने देखील बातमी लावली . अजब रे बाबा देवेन्द्रा … तुझ्या सरकारचा कारभार … असेच आता म्हणायची वेळ आली आहे .
भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरी केली जाते. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली.
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना भगतसिंग आणि सुखदेव यांना ओळखता येत नाही का, इतकंच नाही तर दोघांचे फोटो लावताना किमान या दोन वेगवेगळ्या व्यक्ती हेसुद्धा एकाही व्यक्तीच्या ध्यानात येऊ नये, याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले आहेत.
शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अप्पर मुख्य सचिव पी.एस.मीना, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक आदी मान्यवर उपस्थित होते.


