मुंबई-पावसाळ्यात समुद्राचे अवखळ रूप दिसले नाही तर नवल .. जशी भीती तसा आनंद हि मिळतो … रौद्र रुपा पासून सावध राहत समुद्राच्या अवखेळते बरोबर सुट्टी एन्जॉय करण्यास आज अनेक मुंबईकरांनी पसंती दिली .
दरम्यान मुंबई सह ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कळवा स्थानकाजवळ पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला . पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन मंदगतीने धावत होत्या. दरम्यान, रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक होता . तर अंबरनाथ- बदलापूरदरम्यानच्या पुलाची तांत्रिक दुरुस्ती कामासाठी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद होती


