सांस्कृतिक कार्य खात्याच्या अधिकाऱ्यांनीच केले,मंत्री आणि राज्यमंत्र्याच्या कामकाजाचे वाटप.. कॅबिनेट मंत्री कार्यालय अनभिज्ञ..!

Date:

मुंबई(शरद लोणकर )- महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री आणि राज्यमंत्र्यामध्ये कामकाजाचे वाटप अद्याप ठरलेले  नसले,तरी मंत्री अमित देशमुख आणि राज्यमंत्री राजेंद्र पाटील( यड्रावकर) यांच्या कामकाजाचे वाटप मात्र सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून टाकले आहे.त्यामुळे अनेक दिवसांपासून राज्यमंत्री कार्यालयात निर्णया अभावी विभागाच्या अनेक फाईली पडून असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात  महाविकास आघाडीचे सरकार येवून चार महिने झाले तरी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांना कोणते अधिकार दयावेत, यावर सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षाच्या प्रमुखांनी अद्याप ठरविलेले नाही.त्यामुळे सध्या राज्यमंत्र्यामध्ये जोरदार कुरबुरी सुरू आहे.

पण सांस्कृतिक कार्य खात्यातील “कार्यक्षम” अधिकाऱ्यांनी आपल्या सर्व फाईली सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री पाटील(यड्रावकर ) यांच्या मार्फत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठविण्याचा परस्पर निर्णय घेतला असल्याने याबाबत देशमुख यांचे कार्यालय अनभिज्ञ असल्याचे समजते.

आज दहा बारा दिवसापासून संबंधित अधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्य  राज्यमंत्री यांच्याकडे विविध फाईली पाठविण्यास सुरुवात केली आहे.परंतु यावर काय निर्णय घ्यावा.या निर्णयाप्रत राज्यमंत्री यांचे कार्यालय आले नसल्याने अनेक फाईली तशाच पडून आहेत. मात्र यामुळे  निर्णय घेण्यासाठी देशमुख यांचे कार्यालय फाईली येण्याची वाट पहात बसले आहे.

मुळात अद्याप राज्यमंत्री यांना काय अधिकार दयावा, यावर सरकारचा  धोरणात्मक निर्णय झालेले नसताना,सांस्कृतिक कार्य खात्यातील अधिकारी प्रत्येक फाईल/प्रस्ताव राज्यमंत्र्याना का मार्क करतात, असा प्रश्न सध्या विभागात चर्चेला जात आहे.त्यामूळे अनेक विषय मार्गी लागत नसल्याचे विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या विभागाला सध्या दोन्ही मंत्री नवीन आहे.तसेच त्यांनीं घेतलेला कार्यालय स्टाफ हा सुद्धा नवीन असल्याने या विभागात चांगलाच सावळा गोंधळ उडालेला आहे.मात्र याचा पुरेपूर फायदा विभागातील     अधिकाऱ्यांनी  घेतला असून याचा परिणाम मात्र पुढे   सांस्कृतिक क्ष्रेत्रात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान केल्याचा प्रकार उघड

पुणे, दि. 4 मार्च: गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे...

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठिंबा: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई, दि. ४ मार्च २०२६.राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत...

श्री रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९वे वार्षिक रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

पुणे- आर. एम. धारीवाल फाउंडेशन तर्फे समाजसेवेची अखंड परंपरा...

मुळा-मुठा नदी प्रदूषणाविरोधात ‘एमआयटी’च्या विद्यार्थ्यांचा एल्गार

नदीपात्रात अवैध कचरा टाकण्याविरोधात विद्यापीठ प्रवेशद्वारावर आंदोलन; आगी व...