सांस्कृतिक कार्य खात्याच्या अंतर्गत स्थापन केलेल्या अशासकीय समित्या बरखास्त..!

Date:

मुंबई — सांस्कृतिक कार्य विभागाअंर्तगत सर्व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या आणि मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.याबाबत सांस्कृतिक कार्य विभागाने “शासन निर्णय”जारी केला.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी सर्व विभागातील अशासकीय सदस्य असलेल्या समित्या बरखास्त करण्याचा निर्णय तातडीने घेतला होता. त्यानुसार अनेक विभागाने आपल्या विभागकडे असलेल्या समित्या बरखास्त केल्या. मात्र सांस्कृतिक कार्य खात्यातील समन्वयाच्या अभावामुळे नेमका शासन निर्णय कोणत्या अधिकाऱ्यांच्या सहीने काढावा. या चर्चेच्या फेऱ्यामुळे विविध समित्या आणि मंडळ बरखास्त कारायला काही दिवस उशिर झाला होता.
दादासाहेब फाळके चित्रनगरी,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,रंगभूमी परिनिरिक्षण मंडळ, विविध जीवन गौरव पुरस्कार निवड समिती, सर्व अनुदान आणि मानधन समित्या बरखास्त करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य विभागाने म्हटले आहे.
सन २०१४ मध्ये सांस्कृतिक कार्य विभागाने ज्या समित्यावर अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक सदस्यांनी तत्कालीन सरकराच्या विरोधात बोलून सरकारला अडचणीत आणले होते. एका पुरस्कार निवड समितीच्या सदस्याने तर “पुरस्कार वशीलेबाजीने मिळतो”असे खळबळजनक आरोप करुन सांस्कृतिक कार्य खात्याच्या अधिकाऱ्यांना तेव्हा अडचणीत आले होते.काही सदस्य वेळ मिळत नसल्याने बैठकांना फिरकत सुध्दा नाहीत. काहीची निवड तर कशाचा कशाशी ही संबंध नसताना विविध समित्यावर झाली. त्यामुळे यावेळी तरी योग्य सदस्यांची निवड होईल. अशी अपेक्षा सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचे मत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...