मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘विकास दर्शक’ डॅश बोर्डचे उद्‍घाटन

Date:

मुंबई : शासनाच्या सर्व योजनांचा एकाच वेळी आढावा घेता येणारे मुख्यमंत्री डॅशबोर्ड ‘विकास दर्शक’ या वेब आधारित डॅश बोर्डचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते आज मंत्रालयात उद्‍घाटन झाले. या डॅशबोर्ड मुळे लोकाभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर  कामकाजात अधिक पारदर्शकता येऊन प्रशासनाची विश्वासर्हता वाढणार आहे. या डॅशबोर्डमुळे राज्यात डेटा संचालित प्रशासन (data driven governance) आणि प्रत्यक्ष वेळेत प्रशासन (Real Time Governance) याकडे हे महत्वाचे पाऊल ठरले आहे. या डॅशबोर्डचा उपयोग प्रत्येक विभागातील सचिवांना कारता येणार आहे. या डॅशबोर्डचा आढावा मुख्यमंत्री स्वतः वेळोवेळी घेणार आहेत.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या डॅश बोर्डासंबधी विस्तृत माहिती, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सादरीकरणातून दिली.  ॲमेझॉन वेब सर्विसेसच्या क्लाऊडवर हे डॅशबोर्ड होस्ट केले असून याचे सनियंत्रण  माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या ‘महा-आयटी’ या संस्थेमार्फत होणार आहे. ‘विकास दर्शक’ या मुख्यमंत्री डॅशबोर्डवर मुख्यमंत्र्यांना एकाच वेळी सर्व विभागांची एकत्रित आणि सर्वंकश माहिती बघता येणार आहे. एखाद्या योजनेचा आलेख कसा आहे याचा तालुका निहाय आढावा आता एका क्लीक वर  घेता येणार आहे, तसेच प्रथम दर्शनी निदर्शनास येणाऱ्या प्रमुख अडचणींचेही तत्काळ निरसन करता येणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना, जलयुक्त शिवार योजना, मध्यान्ह भोजन योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनांच्या प्रगतीचा आणि सद्य स्थितीचा आढावा घेता येणार आहे.
राज्यात ई-गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी या डॅशबोर्डमुळे मदत होणार आहे. राज्यात उपलब्ध असलेल्या माहितीचे एकत्रिकरण करून वेगवेगळ्या विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीचा अभ्यास करून त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारे हे डॅशबोर्ड आहे. सध्या  20 विभागांच्या 37 योजनांचा यात समावेश आहे. सुमारे 50 पेक्षा अधिक विभाग आणि योजनांचा आणि 250 माहिती स्त्रोतांचा अभ्यास करून ‘विकास दर्शक’ हे मुख्यमंत्री डॅशबोर्ड तयार झाले आहे. यात सुमारे 40 हुन अधिक माहिती स्त्रोत जोडले आहेत. या डॅशबोर्डला आकार देण्यासाठी यात येणारे विविध घटकांसमवेत सुमारे 300 पेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या.
सामान्य नागरिकांनाही मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या बातम्या असलेल्या ट्विटर, फेसबुक खाते आणि इतर  माहिती या डॅशबोर्डवर पाहता येणार आहे. त्याच प्रमाणे नागरिकांना आपला प्रतिसाद नोंदविता येणार आहे. योजनेसंबधी माहिती व इतर काही माहिती हवी असल्यास  चॅटबोट या अप्लिकेशनद्वारे प्रत्यक्ष प्रश्नही विचारता येणार आहेत. विभागाच्या उत्कृष्ठ कामकाजासाठी तसेच योजनेच्या उपयुक्ततेसाठी ‘स्टार रेटींग’ मिळणार आहे. यामुळे विभागांमध्ये सकारात्मक स्पर्धेचे वातावरण तयार होऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. https;//cmdashboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवरुन अधिक माहिती घेता येणार आहे.
००००
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत देण्याचे महापौरांचे आदेश,दिड तासात पुण्यात ३६ ते १०४ मिमी पाऊस

पुणे- महानगरपालिका कार्यक्षेत्रात दि.०२/०४/२०२६ रोजी सायंकाळी ३.३० ते ०५.००...

तुळशीबाग श्रीराम मंदिरात हनुमान जयंती सोहळा

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने आयोजन ; कीर्तनकार दर्शनबुवा...

समर्थ पथ कर्वेनगर पुन्हा पाण्यात ..”सफाई” ची चौकशी करा

 पुणे- समर्थ पथ कर्वेनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करूनही...

वीजपुरवठ्याची लपाछपी:वीज कर्मचाऱ्यांची कसरत

झाडे पडणे, पाणी तुंबल्यामुळे वीजवाहिन्या बाधित-दुरुस्तीचे काम वेगाने सुरू पुणे, दि. २ एप्रिल,...