राज्य उत्पादन शुल्क विभागातील सेवा ऑनलाईन – राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Date:

मुंबई, दि. 29 – मद्य निर्मिती व वि‍क्रीबाबत लागणारे परवाने आणि सेवा ऑनलाईन करण्यासाठी कामकाजाचे सुलभीकरण व अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बावनकुळे बोलत होते.

श्री. बावनकुळे म्हणाले, मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत कामकाज सुलभीकरण (ease of doing business) पद्धतीही राबविण्यात येत आहे. यासाठी 30 जून 2018 ला प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने मद्य निर्मिती व विक्री या अंतर्गत काम करणाऱ्या व्यापारी संस्था, हॉटेल चालक, किरकोळ व घाऊक मद्य विक्रेते यांच्याशी चर्चा केली.

या उद्योजकांना दररोजचे कामकाज आणि सेवांमध्ये येणाऱ्या अ‍डचणी लक्षात घेता कामकाज सुलभीकरण आणि पारदर्शक कसे करता येईल यासाठीचे उद्योजकांचे प्रस्ताव मागविले होते. त्यानंतर समितीने अहवाल सादर केला आहे. कामकाज सुलभीकरणाची ही पद्धत राज्य उत्पादन शुल्क विभागाने यशस्वीपणे राबवली आहे. त्यामुळे किरकोळ परवान्यासारख्या कामांना लागणाऱ्या वेळेची बचत होत आहे.

आता प्रत्येक कामासाठी मुख्यालयात येण्याची आवश्यकता नाही. जिल्हा स्तरावरच अनेक कामे करता येतात. हॉटेल उद्योगाला लागणारे परवाने ऑनलाईन झाले व निर्णय प्रक्रिया कालबध्द करण्यात आली. मद्यनिर्मिती व मद्यविक्री स्वयंचलित प्रणालीद्वारे नियंत्रित केली जात आहे, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

महाऑनलाईनच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात येणारे विविध परवाने व अनुज्ञप्त्या ऑनलाईन देण्यात येतात. यामुळे परवान्यांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी झाली असून परवाना पद्धती सुलभ झाली आहे.

मद्य निर्मिती उद्योगास लागणारे परवाने, उद्योगांमध्ये ओव्हर टाईम करण्यास परवानगी, एका पाळीतील काम दोन पाळ्यांमध्ये, कामगारांसाठी मंजुरी व क्षेत्रफळ मंजुरीची कामे आता स्थानिक पातळीवरच केली जातात. यामुळे उद्योजकांना मुख्यालयाच्या कामकाजाकरिता यावे लागणार नाही. यात मळी वाहतूक परवानगी, निर्यात परवानगी याचा समावेश करण्यात आला आहे.

पुनर्विकासात गेलेल्या इमारतीमधील उपाहारागृह अनुज्ञप्तींसाठी उदारमतवादी धोरण या विभागाने अवलंबविले आहे. ह्या अनुज्ञप्ती (लायसन्स) बंद असलेल्या काळात फक्त 10 टक्के अनुज्ञप्ती शुल्क घेण्यात येते. यापूर्वी ते पूर्ण घेण्यात येत होते. प्रत्येक सेवेसाठी सोपी पद्धती अंमलात आणली जात असून सेवा हमी कायद्याअंतर्गत कालबद्ध कालावधीत सर्व सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न या विभागातर्फे करण्यात येत असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

विक्रमी महसूल प्राप्ती

सन 2018-19 या वर्षात राज्य उत्पादन शुल्क विभागाला 15 हजार 323 कोटी रू. व विक्री कराच्या स्वरूपात सुमारे 10 हजार कोटी रू. असा एकूण 25 हजार 323 कोटी रुपये विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. सन 2016-17 मध्ये महसूलात 10 टक्के, 2017-18 मध्ये 9 टक्के व 2018-19 मध्ये 16.5 टक्के महसूल वाढ झाली आहे. कामकाजात करण्यात आलेल्या सुलभीकरणामुळेही महसूल वाढला आहे.

विभागाच्या नियमानुसार विविध नोंदवह्या कमी करुन लेख्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. तसेच विविध प्रकारची विवरण पत्रे ऑनलाईन प्रणालीने विकसित करण्यात येत आहे. तसेच मद्यार्क निर्मितीसाठीची पूर्व परवानगीची अट शिथिल करण्यात आली. आंतर जिल्हा मळी वाहतुकीसाठी लागणाऱ्या परवानगीची बंधने कमी करण्यात आली. मुंबई शहर व उपनगरे या जिल्ह्यामधील ठराविक अनुज्ञप्तांचे प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला भीषण आग

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; परिसरात धुराचे मोठे लोट, नागरिकांच्या...

मराठीला ज्ञान भाषेत रूपांतरित करून पुढील पिढीपर्यंत नेऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात ‘ जावे विनोदाच्या गावा‘ विशेष कार्यक्रम मुंबई, दि....

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; ५ ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई, दि. 27: राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी...