लोककलावंत कडुबाई खरात यांना निवारा हक्क मिळवून देणार – मंत्री रामदास आठवले

Date:

मुंबई  – लोककलावंत कडुबाई खरात यांचे औरंगाबाद चिकलठाणा येथील राहते घर आणि संपूर्ण झोपडपट्टी जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाने प्रशासनाने 21 जानेवारीला पहाटे अन्यायकारक कारवाई करून निष्कसित केली. या अन्यायकारक कारवाई विरुद्ध कडुबाई खरात यांनी नुकतीच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांची बांद्रा येथे संविधान निवासस्थानी भेट घेऊन आपल्यासह शेकडो झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्याचे निवेदन दिले. त्यावर ना रामदास आठवले यांनी त्वरित औरंगाबाद
विभागीय आयुक्तांशी; तसेच उपायुक्तांशी संपर्क साधून लोकगायिका कडुबाई खरात यांच्या घरासह चिकलठाणा झाल्टा नाका येथील तोडण्यात आलेल्या सर्व झोपडपट्टीवासीयांच्या घराचे पुर्नवसन करण्याची सूचना केली.
लोकगायिका कडुबाई खरात यांना बेघर न ठेवता त्यांना निवारा हक्क मिळवून देणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. यावेळी कडुबाई खरात यांनी भीमगित सादर केले. यावेळी औरंगाबाद चे नगरसेवक चेतन कांबळे ; अरुण लोखंडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कडुबाई खरात या एकतारीवर सुरेल कर्णमधुर प्रबोधनकारी भीमगित गात असून त्यांची भीमगिते समाजमाध्यमांवर लोकप्रिय झाली आहेत. कडुबाई खरात यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकीची असून एक मुलगा आणि दोन मुलींचा सांभाळ करताना त्यांच्या जीवनसंघर्षात हक्काचा निवाराही प्रशासनाच्या कारवाईमुळे गेला आहे. या लोकप्रिय लोककलावंत
कडुबाई खरात यांना शासनाने हक्काचे घर दिले पाहिजे अशी मागणी पुढे अली आहे .महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष देऊन लोककलावंत कडुबाई खरात यांना चांगले घर मिळवून द्यावे या मागणीचे निवेदन ना रामदास आठवले यांना देण्यात आले आहे. लोककलावंत गायिका कडुबाई खरात यांच्या घराच्या पुनर्वसनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी ना रामदास आठवलेंनी कडुबाई खरात यांना दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान...

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग,...