पुणे-मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचा प्रश्न सोशल मीडिया च्या माध्यमातून मांडला तो एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून आणि मी प्रश्न मांडल्यावर अवघ्या काही तासात महापौर मुक्ता टिळक,संदीप खर्डेकर,स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी अधिकाऱ्यांसह तेथे धाव घेतली व त्वरित स्वच्छता करवून घेतली याचे मला कौतुक वाटते,आणि आज मी माझ्या नाट्यप्रयोगासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गेले असता तेथील स्वच्छ व प्रसन्न वातावरण बघून मला आनंद झाला.मात्र स्वच्छतेच्या प्रश्नात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असून या साठी एखादी डॉक्युमेंट्री तयार केली व त्या माध्यमातून सोप्या शब्दात नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत तसेच त्याच्या विघटनाबाबत माहिती देता आली व त्या माध्यमातून जनजागृती करता आली तर त्यासाठी मी माझा वेळ व आवाज द्यायला तयार आहे ,किंबहुना आपली पुणे अधिक स्वच्छ व सुंदर होणार असेल तर त्यासाठी स्वच्छता दूत म्हणून काम करण्यास देखील मी तयार आहे असे मनोगत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी व्यक्त केले.
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी प्रभाग कर १३ हा झीरो गार्बेज प्रभाग करण्याच्या दृष्टीने बसविलेल्या ओला व सुका कचरा वर्गीकरणाच्या वेगळ्या कचरा पेट्यांच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी आदर पुनावाला क्लीन सिटीस इनिशिएटिव्ह्ज च्या वतीने प्रभागाची त्रिलो मशीन,ग्लुत्तों मशीन व १०० कचरा पेट्या देण्यात आल्या.हे सर्व यंत्र स्वच्छतेसाठी कार्यान्वित करण्याचा शुभारंभ पटवर्धन बागेतील डा श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या हस्ते करण्यात आला.
मी माझ्या प्रभागात इ कचरा,प्लास्टिक कचरा,जैव वैद्यकीय कचरा यांच्या संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली असून हा प्रभाग झीरो गार्बेज प्रभाग करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे यासाठी नागरिकांचा आणि प्रशासनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मी या कार्यात नक्कीच यशस्वी होईन असा विश्वास या उपक्रमाच्या संयोजिका नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात आदर पुनावाला ग्रुप,क्रिएटिव्ह फाउंडेशन,जनवानी आणि पुणे महानगरपालिका यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभले असून आपले शहर आपला परिसर स्वच्छ व सुंदर असावा यासाठी विविध संस्था संघटना व कंपन्यांनी सी एस आर अंतर्गत आपले योगदान द्यावे असे ही सौ खर्डेकर म्हणाल्या.
आपण आपले घर जसे स्वच्छ ठेवतो तसेच आपला परिसर व आपले शहर ही स्वच्छ असावे हे जोपर्यंत नागरिकांना मनापासून वाटत नाही तोपर्यंत हे कार्य यशस्वी होणार नाही असे सांगतानाच यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.तसेच आपणच कचरा निर्माण करतो त्यामुळे त्याचे वर्गीकरण आणि विघटनाची जबाबदारी ही आपलीच असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.
या धर्तीवर कोथरूड मधील सर्वच प्रभागात अशी मोहीम राबवून आपला कचरा आपल्याच भागात जिरविण्याचा प्रयत्न करू असे वारजे कर्वेनगर प्रभाग समितीचे अध्यक्ष सुशील मेंगडे म्हणाले.तर या सर्व उपक्रमांना सक्रिय सहकार्य करू असे मनोगत नगरसेवक दीपक पोटे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास नगरसेवक दीपक पोटे,माधुरी सहस्रबुद्धे,सहाय्यक आयुक्त गणेश सोनुने,वरिष्ठ आरोग्य निरीक्षण दीपक ढेलवान,अलंकार पोलीस स्टेशनच्या पो नि रेखा साळुंखे,जनवाणीचे पावन बडगुजर,भाजप चे प्रभाग अध्यक्ष गौरी करंजकर,सरचिटणीस बाळासाहेब धनवे,राजेंद्र येडे,सुयश गोडबोले,मयूर देशपांडे,ऋत्विक अघोर,कल्पना पुरंदरे,मंगल शिंदे,निलेश गरुडकर,संगीताताई आडवडे,अनुराधा एडके, अपर्णा लोणारे,सुवर्णा काकडे,इ मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..श्री राज तांबोळी यांनी सुंदर फेटा बांधून मुक्ता बर्वे यांचा सन्मान केला,तर पटवर्धन बागेतील नागरिकांनी चंद्रकांत भिसे,मालतीताई दाणी,अंजलीताई रोडे यांच्या हस्ते मुक्ता बर्वे यांना सन्मानित केले.अनुज खरे यांनी महाराष्ट्रातील सस्तन प्राणी हे पुस्तक भेट देऊन तर सारंग राडकर यांनी पुणे विद्यापीठ इमारत जेथे मुक्ता बर्वे यांचे शिक्षण झा ले त्याचे तैलचित्र देऊन मुक्ता बर्वे यांचा सन्मान केला.मुक्ता बर्वे यांनी स्वच्छतेचा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्याबद्दल पतित पावन संघटनेच्या वतीने सीताराम खाडे,मनोज नायर,दिनेश भिलारे,गोकुळ शेलार यांनी त्यांना सन्मानित केले.
प्रास्ताविक मंजुश्री खर्डेकर,सूत्र संचालन संदीप खर्डेकर तर आभार प्रदर्शन गणेश सोनुने यांनी केले.

