मुकेश अंबानींचा Jioच्या संचालकपदाचा राजीनामा, आकाश अंबानी नवे चेअरमन

Date:

मुकेश अंबानी आपले 16 लाख कोटी रुपयांहून अधिकचे साम्राज्य नव्या पीढीकडे सोपवण्याची तयारी करत आहेत. धीरुभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर संपत्तीच्या वाटणीवरुन मुकेश यांचा त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्यासोबत वाद झाला होता. अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी मंगळवारी रिलायंस जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिलायंस जिओच्या बोर्डाने त्यांचे सुपुत्र आकाश अंबानी यांची बोर्डाच्या चेअरमनपदी करण्यात आलेल्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.

मुकेश अंबानी यांनी गत डिसेंबर महिन्यात कंपनीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केले होते. ‘मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवे नेतृत्व पुढे आणावे लागेल,’ असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर जिओची कमान नव्या पिढीकडे सोपवण्यात येईल, अशी अटकळ व्यक्त केली जात होती. आता ही गोष्ट प्रत्यक्षात आली आहे.

अंबानी कुटुंबाची ओळख

रिलायंस इंडस्ट्रीजचा पाया धीरुभाई अंबानी यांनी रचला होता. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातच्या सौराष्ट्रमधील जुनागड जिल्ह्यात झाला होता. त्यांनी व्यवसायात पाऊल टाकले तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता किंवा बँक बॅलन्स नव्हते. त्यांचे 1955 मध्ये कोकिळाबेन यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुकेश व अनिल ही 2 मुले, तर दीप्ती व नीना या 2 मुली आहेत. 6 जुलै 2002 रोजी धीरुभाई यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या संपतीच्या वाटणीत पत्नी कोकिळाबेन यांची मुख्य भूमिका पार पडली होती.

आकाश-ईशा व अनंत

1. आकाश अंबानीः 2014 मध्ये ब्राउन यूनिव्हर्सिटीतून इकोनॉमिक्सची डिग्री घेतली. त्यानंतर फॅमिली बिझनेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा जिओ प्लॅटफॉर्म्स, जिओ लिमिटेड, सावन मीडिया, जिओ इन्फोकॉम, रिलायंस रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डात समावेश आहे. 2019 मध्ये त्यांचे श्लोका मेहताशी लग्न झाले.

2. ईशा अंबानीः येल व स्टॅनफोर्डमध्ये शिक्षण घेतले. 2015 मध्ये फॅमिली बिझनेस जॉइन केला. त्यांचाही जिओ प्लॅटफॉर्म्स, जिओ लिमिटेड, रिलायंस रिटेल व्हेंचर्सच्या बोर्डात समावेश आहे. ईशाचे लग्न डिसेंबर 2018 मध्ये उद्योगपती अजय पीरामल यांचे सुपुत्र आनंद पीरामल यांच्याशी झाले.

3. अनंत अंबानीः अमेरिकेच्या ब्राउन यूनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. त्यांचा रिलायंस न्यू एनर्जी, रिलायंस न्यू सोलार एनर्जी, रिलायंस O2C, जिओ प्लॅटफॉर्म्सच्या बोर्डात समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामतीत

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार...

वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.

पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार...

भाजपा ज्येष्ठ नेते धनराज आसवानी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पिंपरी, पुणे (दि. २७ डिसेंबर २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील...

आंदेकर पुन्हा येणार ..उमेदवारी अर्ज भरायला ..आज अपूर्णच राहिले काम

पुणे-आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या...