महावितरणचा ‘इलेक्ट्रिक व्हेईकल’च्या पुढाकाराकरिता राष्ट्रीयस्तरावर गौरव

Date:

आत्मनिर्भर भारत परिषदेत ‘इलेट्स इनोव्हेशन’ ॲवार्ड प्रदान

मुंबई, दि.२० एप्रिल २०२२: महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकलच्या अनुषंगाने पुढाकार घेत राज्यात केलेल्या कामाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. महावितरणला  आत्मनिर्भर भारत परिषदेत ‘ट्रान्सपोर्ट अँड मोबिलिटी’ या कॅटेगरीत ‘इलेट्स इनोव्हेशन ॲवार्ड’ प्रदान करण्यात आला.  केंद्रीय टेक्सटाईल्स मंत्रालयाचे सचिव श्री.यु.पी.सिंग यांच्या हस्ते देण्यात आलेला हा पुरस्कार महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री.प्रसाद रेशमे यांनी स्वीकारला.

ई-वाहनांचा वाढता वापर पाहता महावितरणकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी तसेच नवीन चार्जिंग स्टेशन्सला सुलभ प्रक्रियेद्वारे तत्पर वीजजोडणी देण्यासाठी गती देण्यात आली आहे. त्यासाठी एक खिडकी स्वतंत्र वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात केलेल्या या सर्व कामाची नोंद घेत हा पुरस्कार महावितरणला देण्यात आला आहे.

       राज्य शासनाने ई-वाहन धोरणाद्वारे महावितरणची इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधा पुरविण्यासाठी राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. ही जबाबदारी स्वीकारून महावितरणकडून पहिल्या टप्प्यात ५० नवीन चार्जिंग स्टेशन्स उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यामध्ये पुणे-१८, नवी मुंबई- १०, ठाणे- ६, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर व अमरावती येथे प्रत्येकी २ तसेच नागपूर येथील ६ चार्जिंग स्टेशन्सचा समावेश आहे. त्यानुसार महावितरणने पुणे येथे पहिल्या ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले.

महावितरणने इलेक्ट्रिक वाहन असलेल्या ग्राहकांसाठी  ‘पॉवर अँप’  उपलब्ध करून दिले आहे. या अॅपमध्ये चार्जिंग स्टेशनचे लोकेशन, चार्जिंग चालू बंद करण्याचा पर्याय, चार्जिंग करता आवश्यक चार्जरची उपलब्धता, पेमेंट करता  वालेट उपलब्ध करून दिले आहे. तसेच अँपवरून चार्जिंग करता लागणारा वेळ, चार्जिंग करता वापरले जाणारे वीज युनिट व वाँलेटमध्ये उपलब्ध बॅलन्स यांचीही माहिती ग्राहकांना मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धनकवडीतल्या प्राचार्याला पोक्सोची धमकी देऊन पोलिसांनीच ७ लाख लुटले-फौजदार आणि महिला मार्शलसह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : महाविद्यालयातील विद्यार्थीनीला धाक दाखवून अपहरण केल्याची तक्रार...

महाराष्ट्रात पहिल्यांदाच गुडघेदुखीवर शस्त्रक्रियामुक्त उपचारपद्धतीचा प्रारंभ

लो-डोस रेडिओथेरपीमुळे सांधेदुखीपासून त्वरित आराम मिळणार. रुग्णाच्या प्रकृतीत लवकर...

भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुंबईच्या पदाधिकारी व कार्यकरणीची यादी जाहीर

मुंबई, दिनांक ०९ एप्रिल २०२६ भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा,...

निवडणुकीतील ईव्हीएमची VVPAT ची तपासणी करा: मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ईव्हीएमची (EVMs) तपासणी आणि छाननी करण्याचा आदेश ऐतिहासिक, १६...