मुंबई :-
वीजचोरी प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयाने मे. बालाजी एंटरप्रायजेस या फर्निचर शोरुमचा मालक हितेश सावला याला थ्रिफेज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी केल्याबद्दल दोन वर्षे व पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
ठाणे घोडबंदर रोडवर मानपाडा जवळील मे. बालाजी एंटरप्रायजेस या फर्निचर शोरुमच्या थ्रिफेज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी होत असल्याचे महावितरण भरारी पथकाच्या दि. 25 जानेवारी 2011 रोजी निदर्शनास आले होते. यावेळी पथकाने तपासणी केली असता तेथे डायरेक्ट वीजचोरी होत असल्याचे सिध्द झाले. तत्कालिन अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. प्रविण दरोली यांनी या वीजचोरी प्रकरणाचा छडा लावला.
विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार ठाणे जिल्हा न्यायालयात दोषीविरुध्द खटला चालविण्यात आला. ठाणे जिल्हा न्यायालयाने दि. 23 मार्च 2017 च्या निकालात आरोपी हितेश सावला याला हायटेक वीजचोरी केल्याबद्दल दोन वर्षे व पाच लाख रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. या वर्षातील वीजचोरी प्रकरणातील ही सर्वात मोठी शिक्षा आहे.

