पुणे : जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी (दि. 7) रास्तापेठ येथे आयोजित रक्तदान शिबिरात महावितरण व महापारेषणच्या 84 अधिकारी व कर्मचार्यांनी रक्तदान केले.
रास्तापेठ येथील रिक्रिऐशन हॉलमध्ये केईएम हॉस्पीटलच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्याहस्ते झाले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. संजीव भोळे, महाव्यवस्थापक श्री. अलोक गांगुर्डे, केईम हॉस्पीटलचे जनसंपर्क अधिकारी श्री. किशोर धुमाळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शना गाडेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. प्रशांत चौधरी व श्री. धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. लटपटे यांच्यासह महावितरण व महापारेषणच्या 84 अधिकारी व कर्मचार्यांनी रक्तदान केले. यात महिला अधिकारी व कर्मचार्यांचा समावेश आहे.
या शिबिराच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. प्रशांत चौधरी तसेच श्री. वसंत चव्हाण, श्री. ईश्वर बोकड, श्री. रमेश कांबळे, श्री. चंद्गकांत खंबाईत, श्री. दीपक टिकोने, श्री. ज्ञानेश्वर गुरव आदींनी सहकार्य केले.

