Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महावितरणच्या नव्या स्वरुपातील वीजबिलात क्यूआर कोड उपलब्ध

Date:

पुणे :  महावितरणने वीजबिलाला नवा चेहरा दिला आहे. सुटसुटीत माहितीसह महावितरणच्या वीजग्राहकांसाठी असलेले मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करण्यासाठी या वीजबिलात क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महावितरणचे नव्या स्वरुपातील वीजबिल वीजग्राहकांना वितरीत करण्यात येत आहे. जुन्या वीजबिलाच्या तुलनेत ते सुटसुटीत तसेच रंगसंगतीमुळे अधिकच आकर्षक झालेले आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत बारकोडपेक्षाही अधिक लोकप्रिय व वापर सुरु असलेल्या क्यूआर कोड या वीजबिलात उपलब्ध आहे. या कोडद्वारे वीजग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरण मोबाईल अ‍ॅप थेट डाऊनलोड करता येत आहे. मोबाईलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाऊनलोड करून घेतलेल्या क्यूआर कोड रिडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाईल अ‍ॅपची लिंक उपलब्ध होत आहे व त्याद्वारे हा महावितरण अ‍ॅप डाऊनलोड करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे वीजबिलावरील क्यूआर कोड हा ‘अ‍ॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटींग सिस्टीमवर उपलब्ध आहे.

महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अ‍ॅपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 11 लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरण मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. या अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) नवीन वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही देण्यात येत आहे.

वीजसेवेसाठी अ‍ॅपमध्येच डायलसाठी उपलब्ध टोल फ्री क्रमांकावरून कॉल सेंटरमध्ये संपर्काची व तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्यायावत करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजजोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येत असून संबंधीत ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. यासह महावितरणच्या सेवेबाबत वीजग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय आहे. हे मोबाईल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध आहे. वीजबिलावरील क्यूआर कोडसह महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्ले-स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप, प्ले स्टोअरमधून हा अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...