पुणे, दि. 11 : वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी शुक्रवारी (दि.11) मध्यरात्री 12 वाजेपर्यंत असलेल्या मुदतीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे परिमंडलातील सुमारे 51 हजार वीजग्राहकांनी 15 कोटी 58 लाख रुपयांचा भरणा केला होता.
रास्तापेठ व गणेशखिंड मंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 42,318 वीजग्राहकांनी 12 कोटी 68 लाख रुपयांचा भरणा केला तर पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव, मुळशी तालुक्यातील 8700 वीजग्राहकांनी 2 कोटी 90 लाख रुपयांचा वीजबिलांपोटी भरणा केला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजबिल भरणा केंद्गांवर बिल भरण्यासाठी ग्राहकांचा ओघ सुरु होता.
प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी वीजबिल भरणा केंद्गांतील व्यवस्थेचा वरिष्ठ अधिकार्यांकडून आढावा घेतला व मार्गदर्शन केले. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी दिवसभरात अनेक वीजबिल भरणा केंद्गांना भेटी देऊन वीजग्राहकांसाठी केलल्या व्यवस्थेची पाहणी केली. सोबतच सर्व अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील वीजबिल भरणा केंद्गांना भेटी दिल्या.
वीजबिलाच्या रकमेएवढ्या जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा स्वीकारण्याच्या निर्णयामुळे वीजग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आज सकाळी पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील सर्वच 501 वीजबिल भरणा केंद्ग सुरु झाल्यानंतर वीजग्राहकांचा ओघ वाढत गेला. वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता येईल यासाठी आवश्यक पूर्वतयारीसह सर्वच केंद्गांवर महावितरणच्या कर्मचार्यांची अतिरिक्त स्वरुपात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. हे कर्मचारी दिवसभर जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी ग्राहकांचे अर्ज भरून देत होते व त्यासाठी सहकार्य करीत होते. तसेच जुन्या नोटा स्वीकारण्यासाठीचे अर्ज महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आले.